आमजाई व्हरवडे, सिरसे हद्दीतील सात फुटाचा रस्ता झाला तीस फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:39+5:302020-12-15T04:39:39+5:30
आमजाई व्हरवडे, सिरसे दरम्यान नदीकडे जाणारा एक किलोमीटर अंतर असणारा रस्ता दोन्ही बाजूनी अतिक्रमण झाल्याने दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना ...

आमजाई व्हरवडे, सिरसे हद्दीतील सात फुटाचा रस्ता झाला तीस फूट
आमजाई व्हरवडे, सिरसे दरम्यान नदीकडे जाणारा एक किलोमीटर अंतर असणारा रस्ता दोन्ही बाजूनी अतिक्रमण झाल्याने दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना ऊस वाहतूक व इतर वाहतूक करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. गेल्या दोन वर्षांपासून हे अतिक्रमण काढण्यासाठी अनेकवेळा बैठका झाल्या होत्या, पण तोडगा निघत नव्हता. अखेर सरपंच सुभाष पाटील, सिरसेचे माजी सरपंच अशोक पाटील, तर आमजाई व्हरवडेचे सरपंच आनंदराव कांबळे, माजी सरपंच राजेंद्र चौगले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील आदींनी पुढाकार घेत दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना समजावून सांगत रस्त्याची गरज किती आहे हे पटवून दिले. गेल्या पंधरा वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या रस्त्याचे तब्बल तीस फूट रुंदीकरण झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे
या रस्त्यासाठी दोन्ही गावचे प्रतिष्ठित लोक, दोन्ही ग्रामपंचायतीचे उपरसपंच, सर्व सदस्य यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.