शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जयसिंगपूरच्या दत्त शासकीय पतसंस्थेत साडेसात कोटींचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:47 IST

अध्यक्ष, संचालक, कर्जदारांसह दहाजणांवर गुन्हा : गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : कर्जदारांना संस्थेच्या निधीचे नियमबाह्य कर्ज वाटप करून ७ कोटी ५६ लाख ५६ हजार ११७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी येथील श्री दत्त शासकीय व निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक व शाखाधिकाऱ्यांसह कर्जदारांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संस्थेच्या शिल्लक रकमेचा स्वत:साठी वापर करून आरोपींनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी लेखापरीक्षक सुभाष दादासाहेब देशमुख (रा. शिरोळ) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार महादेव तराळ (रा. जयसिंगपूर), संचालक प्रमोद मनोहर जाधव (रा. जयसिंगपूर), बाळासोा दत्तू लोहार (रा. अतिग्रे), संचालिका रेखा महादेव तराळ (रा. हेरवाड), कर्जदार अनिल बाळासोा घोलप (रा. हेरवाड), कर्जदार रावसाहेब भूपाल कोळी (रा. जयसिंगपूर), कर्जदार वैशाली अनिलकुमार तराळ (रा. जयसिंगपूर), कर्जदार मृत महादेव भाऊ तराळ (रा. हेरवाड), व्यवस्थापक राजीव गणपत कोळी (रा. चिपरी) व शाखाधिकारी इंद्रजित महादेव जाधव (रा. उदगाव) अशी आरोपींची नावे असून, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती.येथील क्रांती चौकानजीक ही पतसंस्था असून, १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील व्यवहाराचे लेखापरीक्षण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, शाखाधिकारी यांनी ३० नोव्हेंबर २०१४ ते २० मार्च २०२५ या कालावधीत कर्जदारांना नियमबाह्य निधीचे वाटप केले. शिवाय नियमबाह्य गुंतवणूक करून शिल्लक रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून फेरलेखापरीक्षणानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.