शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील ‘फुकट्यां’ना सात कोटींचा दंड : नऊ महिन्यांत सव्वालाख जणांचा विनातिकीट प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:38 IST

मिरज-कोल्हापूर, पुणे-मिरज, पुणे-मलवली आणि पुणे-बारामती अशा मंडलअंतर्गत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विभागात एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत एकूण दोन लाख ७६ हजार ८०० विविध प्रकरणांमध्ये दंड म्हणून १४ कोटी ३९ लाख रुपयांहून अधिकची वसुली झाली. यापैकी एक लाख २८ हजार लोक विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत

ठळक मुद्देपुणे विभागाची कारवाई ; मोहीम आणखी तीव्र करणार

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : गर्दीचा फायदा घेत, तिकीट तपासनिसाची नजर चुकवून रेल्वेतून विनातिकीट प्रवास करताना एक लाख २८ हजार लोकांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून पुणे विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत सात कोटी १७ लाख रुपयांचा दंड आकारला.

वेळेत आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्रवाशांकडून पहिली पसंती दिली जाते. त्यामुळे वर्षाकाठी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कोटींमध्ये आहे. काही मार्गांवरील ठरावीक गाड्यांना नेहमीच गर्दी असते. त्याचा फायदा घेत, तिकीट तपासनिसांची नजर चुकवून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. मुख्यत: कमी अंतराच्या व कमी तिकिटाच्या प्रवासातच तिकीट न घेता प्रवास करण्याची मानसिकता जास्त आहे. गर्दीत हळूच बाकावर जाऊन बसणे, तिकीट तपासनीस आल्यावर दुसºया डब्यात जाणे, स्टेशन आल्यावर तत्काळ खाली उतरणे असे प्रकार करून तिकीट चुकविले जाते. हे प्रकार रोखण्यासाठी पुणे विभागाने विशेष मोहीम राबविली.

मिरज-कोल्हापूर, पुणे-मिरज, पुणे-मलवली आणि पुणे-बारामती अशा मंडलअंतर्गत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विभागात एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत एकूण दोन लाख ७६ हजार ८०० विविध प्रकरणांमध्ये दंड म्हणून १४ कोटी ३९ लाख रुपयांहून अधिकची वसुली झाली. यापैकी एक लाख २८ हजार लोक विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत, ज्यातून सात कोटी १७ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. उपविभागीय रेल्वे प्रबंधक, अप्पर मंडल रेल्वे प्रबंधकांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, विभागीय वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन, साहाय्यक वाणिज्य प्रबंधक एस. व्ही. सुभाष यांच्या निरीक्षणाखाली तिकीट निरीक्षक आणि रेल्वे संरक्षण दलाच्या सहकार्याने ही तपासणी मोहीम राबविली.

 

  • गेल्यावर्षीपेक्षा दंडात १५ टक्क्यांनी वाढ

पुणे विभागाकडून मागील वर्षाच्या याच कालावधीत दोन लाख ५० हजार प्रकरणांत १२ कोटी २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यामध्ये एक लाख १३ हजार लोक विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले होते. त्यांच्याकडून सहा कोटी २४ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल झाला होता. विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाच्या एकूण रकमेमध्ये दंडात १५ टक्के वाढ झाली. तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्या संख्येत १३ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.

 

प्रशासनाकडून तिकीट तपासणी नियमितपणे सुरू असते. गेल्या नऊ महिन्यांत एक लाख २८ हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास संबंधित प्रवाशाला आर्थिक दंड व मानहानीस सामोरे जावे लागते. कायद्यांतर्गत दंड भरावा लागतो आणि पैसे न दिल्यास त्यांना तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेPuneपुणेSangliसांगली