शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: एसएससी बोर्डाने विद्यार्थ्यांना दिलेल्या हॉल तिकीटावर गंभीर चुका; विद्यार्थी, पालकांत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:13 IST

आज शुक्रवारपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे.

कोपार्डे: आज शुक्रवारपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाकडून देण्यात आलेले हॉल तिकीटात (रिसिट) अनेक चुका आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकात संभ्रम निर्माण झाला असून याबाबत शाळेकडे चौकशी केली जात आहे. शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य ‘प्रिंटिंग मिस्टेक’ म्हणून विषय संपवताना दिसत आहेत.विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटावर एसएससी बोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकात विषय, उत्तर देण्याची भाषा व तारीख व वेळ असे रकान्यात आहेत या वेळापत्रकात पहिली चूक उत्तर देण्याची भाषा (अन्सर ऑफ लँग्वेज) या रकान्यात मध्ये आहे. हिंदी भाषेच्या विषयासाठी उत्तराची भाषा (अन्सर ऑफ लँग्वेज) हिंदी असायला हवी होती. पण या रकान्यातमध्ये हिंदी ऐवजी मराठी आहे. अशीच चूक इंग्लिशच्या विषयाच्या उत्तराच्या भाषेच्या रकान्यात झाली असून ‘इंग्लिश’ ऐवजी ‘मराठी’ असे आहे.तारखेच्या रकान्यातही मोठी चूक झाली आहे. हिंदीचा पेपर ७ मार्चला होणार आहे. पण तारखेच्या रकान्यात ९ मार्च तारीख आहे तर इंग्लिश पेपरच्या तारखेच्या रकान्यात ७ मार्च आहे. विशेष म्हणजे हिंदीचा पेपर ७ तारखेला तर इंग्लिशचा पेपर ९ मार्चला आहे. याबाबत पालकांच्यात संभ्रम निर्माण झाल्याने प्रस्तुत प्रतिनिधींनी एका शाळेच्या प्राचार्यांना याबाबत विचारले असता ‘प्रिंटिंग मिस्टेक’ म्हणून एसएससी बोर्डाच्या चुकीवर पडदा पाडला. एका पालकाने आपले नाव न जाहीर करण्याच्या अटीवर जर विद्यार्थ्यांची चूक झाली असती तर बोर्ड माफ करेल काय?असा सवालही उपस्थित केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावी