शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या हद्दवाढीबद्दल गांभीर्य, आठ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावू; महापौरांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:57 IST

कृती समितीने घेतली भेट, ग्रामीण जनतेशी संवाद सुरू

कोल्हापूर : हद्दवाढीच्या मागणीचे मला गांभीर्य आहे आणि तो जिव्हाळ्याचाही विषय आहे. त्यामुळे तो सुटला पाहिजे. येत्या आठ दिवसात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी बुधवारी सर्वपक्षीय नागरी कृती समितीला दिली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!शहराची हद्दवाढ गरजेची आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरकरांना शब्द दिला होता. अख्ख गाव म्हणतंय हद्दवाढ करा, मग का होत नाही याचे गुपित मलाही समजलेले नाही, असे सांगत माझ्या पातळीवर हद्दवाढीच्या अनुषंगाने गेल्या चार दिवसांपासून ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे. कृती समितीने यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही महापौर निकम यांनी केले.महानगरपालिकेत कृती समितीचे सर्व सदस्य महापौरांना भेटायला गेले होते. महापौरांनी हद्दवाढ करण्याच्या कामात पुढाकार घ्यावा, ज्यांनी हद्दवाढीची आश्वासने दिली होती, त्या पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासमवेत आमची भेट घडवून आणावी, असे आवाहन कृती समितीने महापौरांना केले. त्यावेळी निकम यांनी हद्दवाढीचा प्रश्न माझ्या कारकिर्दीत सुटला तर मला नक्कीच आनंद होईल, असे सांगितले.शहरापेक्षा ग्रामीण भागात घरफाळा, पाणीपट्टी जास्त असल्याची बाब ग्रामीण जनतेला पटवून दिली पाहिजे, असे संजय शेटे यांनी सांगितले. महासभेने पुन्हा एकदा ठराव करून शासनाकडे पाठवावा, असे आवाहन अशोक भंडारे यांनी केले. मूठभर लोक ग्रामीण जनतेला वेठीस धरत आहेत. यापुढे जर हद्दवाढीला विरोध केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राजू जाधव यांनी दिला.शेजारच्या गावासाठीचे प्राधिकरण रद्द करायला भाग पाडले पाहिजे. तुम्ही पुन्हा एकदा ठराव करून सरकारकडे पाठवा, असे आवाहन दिलीप देसाई यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढीचा ठराव नेला त्याचे काय झाले, अशी विचारणा करत आम्हाला निधीसाठी हद्दवाढ नको आहे, जगण्याच्या हक्कासाठी पाहिजे, असे बाबा इंदुलकर यांनी स्पष्ट केले.यावेळी किशोर घाटगे, भरत काळे, ॲड. प्रमोद दाभाडे, विशाल देवकुळे, महेश यादव, सुशील भांदिगरे, अजय कोराणे यांनीही आपापले मत मांडले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur expansion seriousness: Meeting with CM in eight days, Mayor assures.

Web Summary : Mayor assures meeting with CM regarding Kolhapur's expansion within eight days. Public action committee urges prompt action. Discussions highlighted the necessity of expansion for essential rights, not just funds. Concerns raised about disparities in taxes between urban and rural areas.