आगळ्या गेट टुगेदरचा वेगळा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST2021-09-14T04:30:09+5:302021-09-14T04:30:09+5:30
स्मशानभूमीच्या बाजूने कठडा नसल्याने पावसाचे पाणी सरळ स्मशानभूमीत घुसत होते. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. हे ओळखून ...

आगळ्या गेट टुगेदरचा वेगळा उपक्रम
स्मशानभूमीच्या बाजूने कठडा नसल्याने पावसाचे पाणी सरळ स्मशानभूमीत घुसत होते. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. हे ओळखून सरपंच सी. ए. पाटील यांनी गावातील युवकांसमोर समस्या मांडली. ‘गणेशोत्सवात आपण एकत्र आल्यावर गावासाठी एक दिवस श्रमदान’ हा उपक्रम राबवूया या सरपंच पाटील यांच्या आवाहनाला युवकांनी प्रतिसाद दिला. म्हाळेवाडी गावातील युवक तसेच मुंबई, पुणे व गोवा अशा विविध शहरात राहणाऱ्या युवकांना सरपंच पाटील यांनी एकत्र करून हा आगळावेगळा उपक्रम राबविला. त्यांनी स्मशानभूमीच्या बाजूने अडीच फूट कठड्याचे काँक्रिटीकरण पूर्ण केले.
याकामी सरपंच पाटील यांच्यासह डी. एल. पाटील, निंगाप्पा दळवी, रामनाथ दळवी, प्रमोद पाटील, अनिल पाटील, रुक्माणा दळवी, शंकर पाटील, संदीप दळवी, सचिन पाटील, जगदीश पाटील, दिलीप पाटील, पप्पू कोकितकर, विजय दळवी, राहुल दळवी, डी. एस. पाटील, रमेश पाटील, भरमू पाटील, साई दळवी यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील युवकांनी स्मशानभूमीच्या कठड्याचे केलेले काँक्रिटीकरण.
क्रमांक : १३०९२०२१-गड-२६