शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

Kolhapur: पशुप्रेम अन् माणुसकीचे दर्शन!; हरवलेली म्हैस शेतकऱ्याने परत केली, अन् मालकीणीच्या जीवाची घालमेल थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:29 IST

हरवलेली दुभती म्हैस सापडली, ललीताचा जीव पडला भांड्यात

राम मगदूमगडहिंग्लज : साठ हजाराची म्हैस हरविल्यामुळे ‘ती'बेचैन होती. परंतु, एका संवेदनशील शेतकऱ्याच्या गोठ्यात ती सुरक्षित होती. त्यानेच म्हशीच्या मालकीणीचा शोध घेतला आणि म्हैस हवाली केल्याने तिच्या जीवाची घालमेल थांबली. आनंदाश्रुंनी पाणावलेल्या डोळ्यांनी तिने लमाणवाड्याची वाट धरली. कुटुंबांच्या जगण्याचा एकमेव आधार असणारी दुभती म्हैस गवसल्यामुळे ‘ललीता’चा जीव भांड्यात पडला.हकीकत अशी, नेसरीनजीकच्या हडलगेपैकी लमानवाड्यातील ललीता प्रकाश लमाण यांची म्हैस ४ दिवसापूर्वी बांधलेल्या दोरीसह अंगणातून नजरेआड झाली. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला. तिने सभोवतीच्या जंगलासह परिसरातील दाहीदिशा धुंडाळल्या. परंतु, म्हैस न सापडल्यामुळे हतबल झाली.दरम्यान, तावरेवाडीचे उपसरपंच प्रशांत तुरटे यांना रात्री त्यांच्या शेतातील घराजवळ काळ्या रंगाचा प्राणी दिसला. प्रथमदर्शनी गवा रेडा असेल असे त्यांना वाटले. बॅटरीच्या उजेडात गळ्यात दोरी दिसल्यामुळे ती म्हैस असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी शिताफीने पकडून म्हैस आपल्या गोठ्यात बांधली. म्हशीचा फोटो काढून सोशल मिडीयावर शेअर करुन संपर्काचे आवाहन केले.कानातील बिल्यावरून शोधम्हैशीच्या कानातील बिल्यावरून तुरटे यांनी शिप्पूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश आंबेकर यांच्या मदतीने माहिती काढली. बेळगाव जिल्ह्यातील कोटजवळील बिद्रेवाडीच्या केंपाण्णा वाणी यांचे नाव समोर आले. बिद्रेवाडीतील आपले नातेवाईक विठ्ठल मोहिते यांच्याकरवी त्यांनी वाणींच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दीड वर्षापूर्वी लमाण यांना म्हैस विकल्याचे सांगितले. दरम्यान, ललीता यांनी हडलगे परिसरातही म्हैसीची शोधाशोध केली होती. त्यामुळे हडलगे येथील दुकानदार भारत पाटील यांच्याकडून लमाणवाड्यातील म्हैस हरवल्याचे समजले. त्यावरून तुरटे यांनी ललीता यांना बोलावून घेतले आणि म्हैस त्यांच्या हवाली केली.‘थाना’वरून ओळख पटलीम्हैस तुमचीच कशावरून ? विचारताच ललीताने कानडीतून म्हैशीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुरटेंना तिची भाषा समजली नाही. ललीताची मुलगी सुनिताने मराठीतून म्हैशीची नेमकी ओळख सांगितली. म्हैशीला चारऐवजी पाच ‘थानं’ असून पाचव्या लहान थानातूनही दूध येते, असे सांगितले. खात्रीसाठी तुरटेंनी त्यांना गोठ्यात नेले. तीनवेळचे दूध तटल्यामुळे हंबरणारी म्हैस ललीताने पाठीवरून हात फिरवताच शांत झाली. तिने म्हैशीचे दूधही काढून दाखविले.

म्हशीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाहललीता यांचे पती प्रकाश यांचे कांही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे आजारी सासू व मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्यावरच आहे. मोलमजुरीसह म्हैशीच्या दूधावरच कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. दिवसाला ६ लिटर दूध देणारी म्हैस पुन्हा सापडल्यामुळे तिने देवाच्या रुपात भेटलेल्या  तुरटे यांचे आभार मानले.

पशुप्रेम व माणुसकीचे दर्शन!आजकाल माणसा- माणसातील 'संवाद'ही हरवला आहे.त्यामुळे हरवलेल्या माणसाचा शोध लागणे कठीण झाले आहे.अशा काळात तुरटे यांनी सापडलेल्या म्हैशीला दोन दिवस चारापाणी दिले.स्वत:हुन तिच्या मालकीणीचा शोध घेऊन तिला म्हैस परत दिली.त्यामुळे तुरटे यांचे पशुप्रेम आणि माणुसकीचे नेसरी परिसरात विशेष कौतुक होत आहे.

म्हैशीच्या दुधावरच ललिता यांच्या कुटुंबाचा चरितार्थ अवलंबून आहे.म्हैस सापडली नसती तर तिचे कुटुंब वाऱ्यावर पडले असते. तिला तिची म्हैस मिळवून देता आली, याचा मनस्वी आनंद आहे. - प्रशांत तुरटे उपसरपंच,तावरेवाडी ता.गडहिंग्लज 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीAnimalप्राणी