शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

हयातीच्या दाखल्यासाठी जेष्ठ नागरिकांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 1:42 PM

कडकडीत ऊन आणि भर पावसात जेष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यासाठी बँक तसेच तलाठी कार्यालयाचे हुंबरे झिजवायला लागत आहेत. ही संतापजनक बाब आहे. विशेषतः हुपरीसारख्या ग्रामीण भागात हे नागरिक बँकेसमोर रांगा लावून उभे आहेत.

ठळक मुद्देहयातीच्या दाखल्यासाठी जेष्ठ नागरिकांचा जीव टांगणीलाऊन-पावसात बँक व तलाठी कार्यालयाचे हेलपाटे

मोहन खोत

हुपरी/ कोल्हापूर - कडकडीत ऊन आणि भर पावसात जेष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यासाठी बँक तसेच तलाठी कार्यालयाचे हुंबरे झिजवायला लागत आहेत. ही संतापजनक बाब आहे. विशेषतः हुपरीसारख्या ग्रामीण भागात हे नागरिक बँकेसमोर रांगा लावून उभे आहेत. 

श्रावण बाळ योजनेंतर्गत सरकार जेष्ठ नागरिकांना दर महिना पेन्शन देते. ती रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा होते. सध्या कोरोनाचा कहर चालू आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासन करीत असताना याउलट गेले आठवडाभर कडकडीत ऊन आणि भर पावसात जेष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यासाठी बँक तसेच तलाठी कार्यालयाचे हुंबरे झिजवायला लागत आहेत.

बॅंकेच्या दारात चरचरीत उन्हात हयातीचा दाखला मिळवण्यासाठी उभे असलेले जेष्ठ नागरिक पाहायला मिळत आहे, ही संतापजनक बाब आहे.डिजिलयटेशनच्या युगात कागद विरहित काम करण्याची गरज असतांना कागदाची भेंडोळी घेऊन या कार्यालयातून त्या कार्यालयात वृद्ध आजी-आजोबा हेलपाटे मारत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले आहे. पॉज मशीनवर बोट ठेवताच तीच व्यक्ती आहे कि नाही, समजत असतांनासुद्धा लेखी हयातीच्या दाखल्याची सक्ती कशासाठी? असा सवाल जेष्ठ नागरिक करीत आहेत. 

अधिकारी सावलीत आणि जेष्ठ नागरिक उन्हात अशी स्थिती दिसत आहे.  याशिवाय तलाठी कार्यालयात दाखल्यासाठी प्रत्येकाला २० रुपये दक्षिणा दयावी लागत आहे, ती वेगळीच. 

कोरोना काळात जेष्ठ नागरिकांना जपणे गरजेचे असताना आणि अशा नागरिकांना घरपोच सेवा देण्याची गरज असतांना कोणतेही सामाजिक अंतर न ठेवता रांगेत उभे करून एक प्रकारे प्रशासन हजार रुपड्यासाठी जेष्ठ नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकBanking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर