शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दोन दिवसांत १ कोटींचा चेक पाठवून देतो; कोल्हापुरातील नाट्यगृहासाठी शरद पवारांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 14:49 IST

नाट्यगृहासाठी खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

Sharad Pawar Kolhapur ( Marathi News ) : आगीमुळे जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं आहे. तसंच आपल्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. "राज्यसभा खासदार म्हणून आम्हाला पाच कोटी रुपयांचा निधी असतो. मी आताच माझ्या सचिवाकडे आपला किती निधी शिल्लक आहे, याबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितलं की आपल्याकडे १ कोटी रुपये शि ल्लक आहेत. मी त्यांना सांगितलं की दोन दिवसांत इथं १ कोटी रुपयांचा चेक पाठवून द्या," असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

नाट्यगृह उभा करण्यासाठीच्या निधीबाबत बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, "कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपआपल्या निधीतील २० टक्के रक्कम दिली तर हे नाट्यगृह उभं करण्यास मदत होईल. खासदार शाहू छत्रपती आणि बंटी पाटील यांनी आपल्या निधीतून रक्कम दिली आहे. आता उर्वरित लोकप्रतिनिधींच्या नावाची यादी तुम्ही तयार करा, तुमच्याकडून नाही झालं तर हे काम माझ्यावर सोपवा. मी त्या सर्व लोकप्रतिनिधींना काय सांगायचं ते सांगतो आणि या सगळ्यातून आपण ही वास्तू अतिशय चांगल्या पद्धतीने उभा करू," असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली आहे २० कोटींची घोषणा

करवीरनगरीचे भूषण असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काही दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आग एवढी प्रचंड होती की यामध्ये निम्मे नाट्यगृह जळून खाक झाले. आगीच्या या आक्राळविक्राळ रूपाने अनेकांच्या पोटात खड्डाच पडला. शर्थीच्या प्रयत्नांनी सुदैवाने दर्शनीभाग शाबूत राहिला असला तरी नाट्यगृहाचे संपूर्ण छप्पर आणि आतील संपूर्ण खुर्च्यांसह विद्युत आणि अन्य यंत्रणा निकामी झाली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करत नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सरकारकडून २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा केली होती.

"राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर भक्कमपणे उभारलेले संगीतसूर्य केशवराव भोसले ऐतिहासिक नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापुरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटींची अर्थिक मदत देण्यात येईल," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली होती. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर