शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

Kolhapur Crime: बोगस कागदपत्रे, फेक फोटो लावून ‘सिम’ची भाजीपाल्यासारखी विक्री; एकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 13:08 IST

पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब राज्यांत विक्री

इचलकरंजी : बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे सिम कार्ड वितरीत करणाऱ्या एकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. राहुल बाबूराव माने (वय २७, रा. खोतनगर तारदाळ, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने ही माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकातील पोलिस हवालदार आनंदराव सोपान पाटील यांनी फिर्याद दिली आहे.भाग्यरेखा चित्रमंदिराजवळ राहुल याची आर.एम. कम्युनिकेशन नामक एजन्सी आहे. या दुकानातून बनावट कागदपत्रे तयार करून मोबाइलचे सिम कार्ड विक्री केली जात असल्याची माहिती भारत सरकारच्या दूरसंचार विभागाला कागदपत्रांच्या पडताळणीत आढळली. त्यामुळे त्यांनी ही माहिती कोल्हापूर पोलिसांना दिली. त्यानुसार कोल्हापूरच्या दहशतवादीविरोधी पथकाने तपास केला. त्यामध्ये या दुकानातून सिम कार्डचे डीलर, सबडीलरकडून घेतलेल्या मोबाइल कंपनीचे सिम कार्डस बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री झाले आहेत. कागदपत्रे तपासली असता त्यामध्ये सिम कार्ड खरेदी करणाऱ्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषेतील व्यक्तीचे फोटो आणि त्यास ओळखपत्र म्हणून अनेक विपरीत व्यक्तींच्या आधार कार्डची झेरॉक्स जोडून ते कार्ड ॲक्टिव्हेट करून विक्री केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी माने याला अटक केली असून त्याच्याकडून १४६ सिम कार्ड हस्तगत केली आहेत. त्याने अशा कार्डचे वितरण पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, आदी प्रांतात केल्याची माहिती समोर आली आहे.सिम कार्ड खरेदीसाठी दिलेल्या आधार कार्डावर संबंधित व्यक्तीऐवजी अन्य व्यक्तींचे विविध वेशभूषेतील फोटो लावून या बनावट कागदपत्रांद्वारे सिम कार्ड वितरीत करून ती ॲक्टिव्हेट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सिम कार्डचा वापर देश विघातक कृत्यांसाठी होण्याची शक्यता वर्तविली जात असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तसेच, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी सांगितले.

पंजाब येथे एजंटबनावट कागदपत्रांच्या आधारे ॲक्टिव्हेट केलेले सिम कार्ड वितरण करण्यासाठी पंजाब येथे माने याने एजंट नेमले असल्याचे आणि त्याच्या माध्यमातून पंजाब येथे त्याने १२६ सिम कार्ड वितरीत केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समजले आहे. माने याचा पंजाब येथील त्या व्यक्तीशी ओळख सोशल मीडियावरून झाली होती. त्यामुळे त्याने त्याला सबडीलर म्हणून नियुक्त केले आहे. त्याचा तपास करण्यासाठी येथील पोलिसांचे एक पथक पंजाबला जाणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस