कासारीत ग्रामस्थांचे आत्मक्लेश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST2021-09-25T04:24:34+5:302021-09-25T04:24:34+5:30

सेनापती कापशी : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. या पार्श्वभूमीवर याचा निषेध म्हणून ...

Self-torture movement of villagers in Kasari | कासारीत ग्रामस्थांचे आत्मक्लेश आंदोलन

कासारीत ग्रामस्थांचे आत्मक्लेश आंदोलन

सेनापती कापशी : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. या पार्श्वभूमीवर याचा निषेध म्हणून कासारी (ता. कागल) येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या चौकात आत्मक्लेश आंदोलन केले.

शशिकांत खोत, सरपंच मन्सूर देसाई, धनाजी तोरसकर, राजेंद्र राजिगरे, मधुकर नाईक, आदींनी मनोगत व्यक्त करून किरीट सोमय्या यांचा निषेध केला. यावेळी अंकुश पाटील, सागर पाटील, शशिकांत देसाई, पुरुषोत्तम साळोखे, एम. एस. पाटील, आनंदा आडाव, मुस्ताक देसाई, आदी चिकोत्रा खोऱ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह कासारी ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो :- कासारी (ता. कागल) येथे किरीट सोमय्या यांच्याविरोधात आत्मक्लेश उपोषणास बसलेले ग्रामस्थ व चिकोत्रा खोऱ्यातील पदाधिकारी.

Web Title: Self-torture movement of villagers in Kasari