म्हाळुंगेतील लघुउद्योजकांचा आज आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:57+5:302020-12-15T04:39:57+5:30
कोल्हापूर : म्हाळुंगे (ता. करवीर) येथील लघुउद्योजकांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव ग्रामपंचायतीने आखला आहे. याबाबत आम्हाला न्याय मिळाला ...

म्हाळुंगेतील लघुउद्योजकांचा आज आत्मदहनाचा इशारा
कोल्हापूर : म्हाळुंगे (ता. करवीर) येथील लघुउद्योजकांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव ग्रामपंचायतीने आखला आहे. याबाबत आम्हाला न्याय मिळाला नाही तर आज, मंगळवारी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आत्मदहन करणार आहोत, असा इशारा लघुउद्योजकांनी दिला आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्ता मोठा असतानासुद्धा आम्हा लघुउद्योजकांना हटवून ग्रामपंचायत सुशोभीकरण करणार आहे. तीस वर्षे व्यावसायिक कर आम्ही भरत असताना गेल्या तीन वर्षांपासून आमच्याकडून हा कर घेतलेला नाही. सुशोभीकरणाच्या नावाखाली आमचे त्याच ठिकाणी मागे सरकून पुनर्वसन केले. आता पुन्हा आम्हाला तेथून हटवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसा मागे घ्याव्यात, आमच्याकडून व्यावसायिक कर भरून घ्यावा, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू. यावेळी सज्जन चौगुले, सुकुमार शेंडुरे ,अजित मोरे, संभाजी पाटील, धनाजी पाटील,, शिवाजी मोरे, रेखा मोरे, नारायण मोरे, आबासो मोरे उपस्थित होते.
--
इंदुमती गणेश