महाराष्ट्र केसरीसाठी पृथ्वीराज, संग्राम यांची कोल्हापूर जिल्हा संघात निवड

By सचिन भोसले | Published: November 9, 2023 05:05 PM2023-11-09T17:05:22+5:302023-11-09T17:06:59+5:30

माती गटातून श्रीमंत भोसले, अतुल डावरे यांचा समावेश

Selection of Prithviraj Patil, Sangram Patil in Kolhapur District Team for Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरीसाठी पृथ्वीराज, संग्राम यांची कोल्हापूर जिल्हा संघात निवड

महाराष्ट्र केसरीसाठी पृथ्वीराज, संग्राम यांची कोल्हापूर जिल्हा संघात निवड

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ६५वे कुस्ती अधिवेशन दि. १६ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत उस्मानाबाद (धाराशिव) येथे होत आहे.  महाराष्ट्र केसरी गादी गटातून पृथ्वीराज पाटील, देवठाणे व संग्राम पाटील, आमशी या दोघांची, तर माती गटातून श्रीमंत भोसले, मिणचे व अतूल डावरे, बानगे यांची जिल्हा संघात निवड झाली.

याकरिता सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे झालेल्या निवड चाचणीत माती व गादी गटातील महाराष्ट्र केसरी व ५७ ते खुल्या गटापर्यंतच्या मल्लांची निवड करण्यात आली.

अमोल बोंगार्डे , बानगे  व सूरज अस्वले, आणूर 
६१ कि . वैभव पाटील ,बानगे व रमेश इंगवले, आणूर
६५ कि . शुभम पाटील खुपिरे व सोंनबा गोंगाणे , निगवे खालसा,
७० कि .सौरभ पाटील , रा शिवडे व विनायक गुरव , मळगे ,
७४ कि. अक्षय हिरुगडे,बान गे व राकेश तांबूळकर , पाचाकटेवाडी,
७९ कि .कूमार शेलार , कोतोली व सचिन बाबर, बानगे ,
८६ कि . किरण पाटील , इस्पुर्ली व नवनाथ गोठम , तांदूळवाडी,
९२ कि . मोहन पाटील , सांगाव व ऋषिकेश पाटील, बानगे
९७ कि. रोहन रंडे , निढोरी व ओकार चौगले , ठिकपुर्ली
महाराष्ट्र केसरी गट, पृथ्वीराज पाटील, देवठाणे व संग्राम पाटील, आमशी यांचा समावेश आहे.

माती विभाग
५७ किलो - चेचर. पोर्ले व सुदर्शन पाटील, म्हाकवे,  
६१ कि. प्रविण वडगावकर, शेंडूर व अजय कापडे , आणूर, 
६५ कि. करणसिह देसाई , भामटे व ऋषिकेश पाटील , कुडित्रे , 
७० कि. कुलदिप पाटील , राशिवडे व निलेश हिरूगडे, बानगे
७४ कि. मचिद्र निऊगरे , साके व प्रशात मागोरे , पिंपळगाव ,
७९ कि. प्रविण पाटील , चापोडी व साताप्पा हिरूग डे ,बानगे ,
८६ कि. कौतुक डाफळे , पिंपळगाव व भगतसिह खोत, माळवाडी ,
९२ कि . ह्रदयनाथ पाचकटे , पाचाकटेवाडी व शब्बीर शेख , ईचलकंरजी
९७ कि .बाबासो रानगे , आरे व शशिकांत बोगार्डे , बानगे, केसरी गट , श्रीमंत भोसले , मिणचे व अतूल डावरे ,बानगे यांचा समवेश आहे.

यावेळी तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी . पाटील, शहर अध्यक्ष हिंदकेसरी दिनानाथ सिंह, सरचिटणीस महादेवराव आडगूळे, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर,  उपमहाराष्ट्र केसरी अमृत भोसले , अशोक माने ,कार्याध्यक्ष संभाजी वरुटे , उपाध्यक्ष प्रकाश खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Selection of Prithviraj Patil, Sangram Patil in Kolhapur District Team for Maharashtra Kesari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.