शिरोळ दत्त पॉलिटेक्निकच्या नऊ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:16 IST2021-07-09T04:16:52+5:302021-07-09T04:16:52+5:30

मेकॅनिकल विभागातील क्षितिजा पाटील, स्वप्नाली कुरले, नेहा देसाई, स्मिता पाटील, अश्विनी सावंत, निहाल मुल्ला, स्वरूप परीट, नीलेश पाटील, इलेक्ट्रिकल ...

Selection of nine students of Shirol Dutt Polytechnic | शिरोळ दत्त पॉलिटेक्निकच्या नऊ विद्यार्थ्यांची निवड

शिरोळ दत्त पॉलिटेक्निकच्या नऊ विद्यार्थ्यांची निवड

मेकॅनिकल विभागातील क्षितिजा पाटील, स्वप्नाली कुरले, नेहा देसाई, स्मिता पाटील, अश्विनी सावंत, निहाल मुल्ला, स्वरूप परीट, नीलेश पाटील, इलेक्ट्रिकल विभागातील प्रीती माने हिची निवड झाली आहे. तर कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एल. अ‍ॅन्ड टी. डिफेन्स तळेगाव पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या पहिल्या फेरीमध्येही ४० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

यावर्षी गुणवत्तेमध्ये व कॅम्पस सिलेक्शनमध्ये कॉलेजने मोठे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल, अप्टिट्यूड टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आदी विषयांचे प्रशिक्षण तसेच विविध उद्योजकांचे मार्गदर्शन केले जाते. यशाची ही परंपरा यापुढेही अशीच सुरू राहील, अशी ग्वाही अध्यक्ष पाटील यांनी दिली. प्राचार्य प्रेमसागर पाटील यांनी प्रवेश नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

यावेळी एक्स आॅफिसिओ ट्रस्टी एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, सचिन शिंदे, उपप्राचार्य प्रा. निळकंठ भोळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Selection of nine students of Shirol Dutt Polytechnic