कोरे अभियांत्रिकीतील ३३५ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:17+5:302021-01-24T04:11:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल ३३५ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हूद्वारे ...

कोरे अभियांत्रिकीतील ३३५ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल ३३५ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हूद्वारे निवड झाली. महाविद्यालयाला १०० हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भेट दिली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. आपल्या ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी करावा, असा मौलिक सल्ला संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी दिला. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. पी. जे. पाटील, सहयोगी ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचे प्रा. प्रा. आर. सी. शिक्केरी, सर्व विभागप्रमुख, आदी उपस्थित होते. या निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ३ लाखांपासून ते १२ लाखांपर्यंत पॅकेज मिळाले.
२३ वारणा कॉलेज
फोटो ओळी : तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी सत्कार केला. यावेळी प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्रा. एस. टी. पाटील व विभागप्रमुख उपस्थित होते.