शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अकॅडमींच्या आक्रमणांमुळे माध्यमिक शाळांची तपासणी; कोल्हापुरातील एका शाळेला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:34 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ शाळांची तपासणी झाली

कोल्हापूर : जिल्ह्यात अकॅडमीची संख्या भरमसाठ पद्धतीने वाढत असल्याने आता माध्यमिक शाळांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांहून विद्यार्थी कोणत्याही सबळ कारणाशिवाय गैरहजर आहेत, अशा शाळांना नोटिसा काढण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ शाळांची तपासणी झाली आहे. यातील शहरातील प्रतिभानगर येथील क्रांतिज्याेती हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना नोटीस काढण्यात आली आहे.स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने गतवर्षीपासून माध्यमिक शाळेत नाव आणि शिक्षण अकॅडमीमध्ये असा प्रकार सुरू असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून अचानक माध्यमिक शाळांची तपासणी करण्यात येत आहे. यातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी गैरहजर आहेत त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली. योग्य कारण वाटले नसल्यास नोटीस काढण्यात आली आहे.प्रतिभानगरमधील वरील शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे वार्षिक नियोजन नाही, दैनंदिन नियोजन नाही, एकाही वर्गात वेळापत्रक नाही, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाची दुरवस्था झाली आहे. शाळा खोल्या अस्वच्छ आहेत आणि ५० टक्के मुले गैरहजर यामुळे या शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस काढण्यात आली आहे.

पन्हाळा तालाक्यातील पणोरे येथील एका अकॅडमीलाही एक लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली असून ती त्यांनी लागू करून घेतलेली नाही. तसा अहवाल माध्यमिक शिक्षण कार्यालयाला प्राप्त झाला आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी आर. जी. चौगुले, विस्तार अधिकारी डी.ए. पाटील, जयश्री जाधव यांनी वरील ३२ शाळांची तपासणी पूर्ण केली असून जिल्ह्यातील सर्व शाळांना भेटी देण्यात येणार आहेत.