आजही कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:28+5:302021-05-12T04:24:28+5:30
कोल्हापूर : पंचेचाळीस वर्षावरील कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांचे बुधवारी रोजी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालय, ...

आजही कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देणार
कोल्हापूर : पंचेचाळीस वर्षावरील कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांचे बुधवारी रोजी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालय, फिरंगाई, मोरे मानेनगर व पंचगंगा हॉस्पिटल येथे लसीकरण करण्यात येणार आहे. तर कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्यामुळे कोविशिल्डच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरील लसीकरण बंद राहणार आहे.
१८ ते ४४ वयोगटातील ज्या नागरिकांनी पहिल्या डोसकरिता कोविन पोर्टलवर बुधवारची अपॉइंटमेंट घेतली आहे, अशांना भगवान महावीर दवाखाना विक्रम नगर येथील केंद्रावर लस दिली जाणार आहे.
१,०७९ नागरिकांचे लसीकरण
कोल्हापूर शहरात मंगळवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटलमध्ये मिळून एकूण १,०७९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये सावित्रीबाई फुले येथे २८८, पंचगंगा येथे ८०, महाडिक माळ येथे १९७, आयसोलेशन येथे ३१४ व सीपीआर हॉस्पिटल येथे २०० इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात आतापर्यंत १ लाख १२ हजार २२२ पात्र लाभार्थ्याना पहिल्या डोसचे तर ३४ हजार ८१७ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
फोटो क्रमांक - ११०५२०२१-कोल-व्हॅक्सीनेशन
ओळ - कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयातील केंद्रावर मंगळवारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण पार पडले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या. छाया : आदित्य वेल्हाळ