शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ए.एस. ट्रेडर्स फसवणुकीतील संशयितांच्या मालमत्तांचा शोध सुरू, पोलिस अधीक्षकांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 11:55 IST

अटकेपेक्षा मालमत्ता जप्तीस प्राधान्य, विकलेल्या मालमत्ताही जप्त होणार

कोल्हापूर : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए.एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे काम सध्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. संचालक आणि एजंटनी विक्री केलेल्या मालमत्ताही जप्त करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंगळवारी (दि.२७) पत्रकारांशी बोलताना दिली.ए.एस. ट्रेडर्स आणि तिच्या संलग्न कंपन्यांनी गुंतवणूकदारांची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. गुन्हा दाखल असलेल्या २७ संशयितांपैकी केवळ एका संशयिताला पोलिसांनी आजवर अटक केली. इतर संशयितांसह एजंटांनाही अटक करून त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात, अशी मागणी गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक पंडित यांच्याकडे केली होती.मात्र, संचालक आणि एजंटांच्या अटकेपेक्षा त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यास प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली. गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. संशयितांनी त्यांच्याकडील मालमत्तांची विक्री केली तरीही त्यावर जप्तीची कारवाई होणार असल्याचे पंडित यांनी स्पष्ट केले.

उच्च न्यायालयात आज सुनावणीया गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्यासह १४ संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर आज, बुधवारी सुनावणी होणार आहे.

६२ एजंटांची यादीए.एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीने अधीक्षक पंडित यांना निवेदन देऊन ए.एस. मधील एजंटांवरही करवाई करण्याची मागणी केली. लाखो रुपयांचे कमिशन मिळवून अनेक एजंट कोट्यधीश झाले आहेत. ते मालमत्तांची विक्री करण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी कृती समितीने केली आहे. ६२ एजंटांची यादी कृती समितीने पोलिस अधीक्षकांना दिली.

तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणीशाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी प्राथमिक तपास केला. इंगवले यांनी जाणीवपूर्वक तपासात त्रुटी ठेवल्या, विलंब लावला आणि संशयितांच्या अटकेसाठी टाळाटाळ केली. गुन्हे दाखल असलेल्या काही संशयितांशी त्यांनी आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोपही कृती समितीने केला असून, त्यांच्या चौकशीची मागणी निवेदनाद्वारे केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस