थकीत घरफाळा असणाऱ्यांच्या मिळकती होणार सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:14 IST2019-12-02T15:12:06+5:302019-12-02T15:14:54+5:30
थकीत घरफाळा असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ६८५ मिळकतदारांना नोटीस बजावली असून, मुदतीमध्ये थकीत रक्कम जमा केली नसल्यास संबंधितांची मिळकतच सील केली जाणार आहे.

थकीत घरफाळा असणाऱ्यांच्या मिळकती होणार सील
कोल्हापूर : थकीत घरफाळा असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ६८५ मिळकतदारांना नोटीस बजावली असून, मुदतीमध्ये थकीत रक्कम जमा केली नसल्यास संबंधितांची मिळकतच सील केली जाणार आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी वसुलीसाठी विशेष लक्ष दिले आहे. यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. घरफाळा विभागाच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयाने थकीत ६८५ मिळकतदारांना नोटीस बजावली आहे. थकीत रक्कम जमा केली नाही तर मिळकत सील करणे, मालमत्तेवर बोजा नोंद करणे, २४ टक्केदंड व्याज आकरणी करणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
कराची रक्कम जमा करण्यासाठी तसेच नवीन मिळकतींवर घरफाळा नोंद करण्यासाठी कसबा बावडा, प्रभाग क्रमांक १ शुगर मिल व प्रभाग क्रमांक ३ हनुमान तलाव येथे पुढील आठवड्यामध्ये विशेष शिबिर आयोजित केले आहे. दरम्यान, कावळा नाका विभागीय कार्यालयाने ८ लाख ४९ हजार, तर गांधी मैदान विभागीय कार्यालय २ लाख ७३ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.