शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘किफ्फ’चा पडदा आज उघडणार

By admin | Updated: December 19, 2014 23:27 IST

देश-विदेशांतील चित्रपटांची मेजवानी

कोल्हापूर : कोल्हापुरातील चित्रपट चळवळीचा वारसा चालविणाऱ्या तिसऱ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (किफ्फ)चा पडदा उद्या, शनिवारी उघडणार आहे. शाहू स्मारक भवनमध्ये सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या समारंभात सिनेअभ्यासक व समीक्षक सुधीर नांदगावकर यांना चित्रतंत्रमहर्षी कै. आनंदराव पेंटर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तब्बल आठ दिवस रंगणाऱ्या या महोत्सवात दक्षिण कोरिया, फ्रान्स, हंगेरी, तैवान, बांगलादेश, रशिया, इराण, जर्मनी, यू. के., जपान, तुर्कस्तान, बेल्जियम, क्रोएशिया या देशांतील चित्रपट दाखविले जाणार आहेत. कोल्हापुरातील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारे तीन चित्रपट, त्यांच्या कारकिर्दीतील पोस्टर्स व चित्रपटातील स्थिरचित्रांचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. ‘विविध भारती’ या विभागात कोकणी, मल्याळम्, बंगाली, आसामी, तमीळ, कन्नड भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे. ‘कंट्री फोकस’मध्ये चीनमधील तरुण दिग्दर्शकांचे नवीन चित्रपट दाखविले जाणार आहेत. ‘डायरेक्ट फोकस’मध्ये ग्रीक दिग्दर्शक कास्टा गॅव्हरास यांचे तीन महत्त्वपूर्ण चित्रपट दाखविले जाणार आहेत.दिग्दर्शक गुलजार यांच्या गौरवार्थ त्यांनी दिग्दर्शित केलेल्या तीन चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. श्रद्धांजली विभागात व्ही. के. मूर्ती यांनी चित्रित केलेला गुरुदत्त यांचा चित्रपट व ब्रिटिश अभिनेता रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांनी दिग्दर्शित ‘क्लोजिंग द रिंग’ हा चित्रपट दाखविला जाईल. ‘माय मराठी’ विभागात सात अप्रदर्शित चित्रपट प्रेक्षक पसंती पुरस्कारासाठी स्पर्धेत असणार आहेत. महोत्सवात मंगळवारी (दि. २३) सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना अभिनेते दिग्दर्शक नाना पाटेकर यांच्या हस्ते ‘सिनेमाकेसरी कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी (दि. २७) महोत्सवाची सांगता होईल. (प्रतिनिधी)