जाब विचारण्यास गेलेल्या दोघांवर कात्रीने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:41+5:302021-05-12T04:24:41+5:30
कोल्हापूर : तरुणीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांवर कात्रीने हल्ला करून त्यांना जखमी केल्याचा ...

जाब विचारण्यास गेलेल्या दोघांवर कात्रीने हल्ला
कोल्हापूर : तरुणीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांवर कात्रीने हल्ला करून त्यांना जखमी केल्याचा प्रकार करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथे घडला. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात दोघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीकांत अशोक फडतारे हा एका तरुणीचा नेहमी पाठलाग करून तिला त्रास देत होता. त्यामुळे त्या तरुणीच्या दोघा नातेवाइकांनी फडतारे याच्या घरी जाऊन त्याला त्याबाबत जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी श्रीकांत अशोक फडतारे व त्याचा भाऊ बबन सदाशिव फडतारे या दोघांनी त्यांच्यावर कात्रीने हल्ला करून, धक्काबुक्की करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत फडतारे बंधूंवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.