शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

राज्यभरातील दिव्यांगांच्या शाळांना पुन्हा रेड सिग्नल, मुलांचा होतोय कोंडमारा; सामाजिक न्यायकडूनच अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 13:59 IST

शाळा बंद राहिल्याने कर्णबधीर मुलांचे लिहिण्या-वाचण्याचे व शैक्षणिक विकासाचे टप्पे मागे पडत आहेत.

विश्वास पाटील

कोल्हापूर : राज्यभरातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्या. मंगळवारपासून महाविद्यालये सुरु होत आहेत आणि दिव्यांगांच्या शाळा मात्र सुरु करता येणार नाहीत, असा फतवा सामाजिक न्याय मंत्रालयाने गुरुवारी काढला. या मंत्रालयाचे अवर सचिव रा. भा. गायकवाड यांनी तसे आदेश दिव्यांग आयुक्तांना दिले आहेत. गंभीर बाब अशी की, सामान्य मुलांपेक्षा दिव्यांग मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या अडचणी जास्त असताना त्यांच्याच शाळा सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. त्याचा या मुलांच्या विकासावर गंभीर परिणाम होणार आहे. परंतु, त्याचे सोयरसूतक सामाजिक न्याय विभागाला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त झाली.

कोविडच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांच्या शाळेबाबत काय निर्णय घ्यावा, अशी विचारणा करणारे पत्र दिव्यांग आयुक्तांनी ६ ऑक्टोबर २०२१ला सामाजिक न्याय मंत्रालयाकडे पाठवले होते. त्याला या मंत्रालयाने अत्यंत सवडीने २७ जानेवारीला उत्तर पाठवले. सध्या राज्यातील कोविड विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेता दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळा सुरु करणे योग्य होणार नाही. काही कालावधीनंतर रुग्णसंख्या विचारात घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे.कोरोनाची स्थिती असतानाही सामान्य मुलांच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. दिव्यांगांना ऑनलाईन शिक्षण घेणे फारच अडचणीचे ठरते. त्यांचे लक्ष एकाग्र होत नाही. कित्येक पालकांकडे त्यासाठीची उत्तम साधने नाहीत. अनेक दिव्यांगांना एकसारखे बसून राहता येत नाही. ऑनलाईन शिक्षणाचा मुळातच सर्वसाधारण मुलांना येणाऱ्या अडचणीहून जास्त त्रास दिव्यांगांना होतो. परंतु, शाळा बंद ठेवताना त्याचा विचार शासन पातळीवर झालेला नाही.शाळा बंद राहिल्याने कर्णबधीर मुलांचे लिहिण्या-वाचण्याचे व शैक्षणिक विकासाचे टप्पे मागे पडत आहेत. त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होऊ शकतो. परंतु, हे कोणी समजूनच घ्यायला तयार नाही, अशी पालकांची भावना आहे. समाजकल्याण विभागाची वसतिगृहे सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मग दिव्यांगांचीही वसतिगृहे सुरु करण्यात सरकारला काय अडचण आहे, अशी विचारणा होत आहे. दिव्यांगांचेही मोहीम राबवून लसीकरण करण्यात आले आहे. किमान या शैक्षणिक वर्षातील उर्वरित दोन-तीन महिने मुले शाळेत गेली तर त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. पण हे मुर्दाड सरकार समजून घेईल तर..?

किती आहेत दिव्यांग शाळा

अंध, मूकबधीर, अस्थिव्यंग आणि गतिमंद - अनुदानित एकूण : ७२९ विनाअनुदानित - ८०७

अनुदानित शाळेतील विद्यार्थी : ३२,३४४

विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थी : ३२,२८०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळा