‘सीबीएसई बारावी’च्या निकालात जिल्ह्यातील शाळा शंभर नंबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:25 IST2021-07-31T04:25:08+5:302021-07-31T04:25:08+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करून दहावी, अकरावीतील अंतिम गुण आणि बारावीतील अंतर्गत गुणांच्या आधारे मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचा अंतिम ...

‘सीबीएसई बारावी’च्या निकालात जिल्ह्यातील शाळा शंभर नंबरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करून दहावी, अकरावीतील अंतिम गुण आणि बारावीतील अंतर्गत गुणांच्या आधारे मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल सीबीएसईने जाहीर केला. त्यामध्ये जिल्ह्यातील शांतीनिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, संजीवन पब्लिक स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल आदी शाळांचा शंभर टक्के निकाल लागला. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनच्या माध्यमातून निकाल जाणून घेतला. ‘शांतीनिकेतन स्कूल’मधील विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील एकूण १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील २१ जणांना ९० टक्क्यांहून अधिक, तर ४६ जणांना ८० टक्क्यांहून गुण मिळाले आहेत. त्यात प्रांजल शिंदे हिने ९६.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकविला. अस्मि दोशी हिने ९६.६० टक्क्यांसह द्वितीय आणि साक्षी सुमन व पूजा गोपाले यांनी ९५.२० टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, संचालिका राजश्री काकडे, कार्यकारी संचालक करण काकडे, प्राचार्या जयश्री जाधव, उपप्राचार्या मनिषा पाटील, वरिष्ठ माध्यमिक विभागप्रमुख श्रीपाद पाटील यांनी अभिनंदन केले. पेठवडगाव येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचे सर्व ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ८२ मुले, तर सात मुली आहेत. स्कूलमध्ये सौमित्र शिंदे याने ९५.४० टक्क्यांसह प्रथम क्रमांक, तुषार चोपडे याने ९४.२० टक्क्यांसह द्वितीय आणि प्रतीक बंग याने ९४.२० टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळविला. त्यांना संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, सचिव विद्या पोळ, प्राचार्य डॉ. सरदार जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात आत्मरूपा हळदकर आणि प्रतीक्षा हिरवे यांनी ९१.६० टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकविला. सुहानी पोवार हिने ९१. २० टक्क्यांसह द्वितीय आणि आश्लेषा एकशिंगे हिने ९०.४० टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळविला. त्यांना प्राचार्य के. श्रीनिवासराव, उपप्राचार्य ॲन्सी जॉर्ज यांचे मार्गदर्शन लाभले. पन्हाळा तालुक्यातील संजीवन पब्लिक स्कूलचे सर्व २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे प्राचार्य एन. आर. भोसले यांनी सांगितले.
चौकट
काही आनंदी, तर काही नाराज
अपेक्षेप्रमाणे गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला, तर अपेक्षित गुण मिळाले नसलेल्यांनी थोडी नाराजी व्यक्त केली. नाराज असलेल्या काही विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा विचार केला असल्याचे काही प्राचार्यांनी सांगितले.
फोटो (३००७२०२१-कोल-प्रांजल शिंदे (शांतीनिकेतन), अस्मि दोशी (शांतीनिकेतन), साक्षी सुमन (शांतीनिकेतन), पूजा गोपाले (शांतीनिकेतन), सौमित्र शिंदे (पूनावाला स्कूल), तुषार चोपडे (पूनावाला स्कूल), प्रतीक बंग (पूनावाला स्कूल).