शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'राजाराम' बंधाऱ्यात शाळकरी मुलगा बुडाला, एकाला वाचवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:38 IST

dam, accident, kolhapurnews कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेला एक बारा वर्षाचा शाळकरी मुलगा बुडाला. तर त्याच्या मित्राला वाचवण्यात राजाराम बंधारा ग्रुपच्या कार्यकर्त्यांना यश आले. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या मुलाचा अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांबळे यांनी शोध घेतला. पण तो आढळून आला नाही.

ठळक मुद्दे'राजाराम' बंधाऱ्यात शाळकरी मुलगा बुडालाएकाला वाचवण्यात यश

कसबा बावडा : येथील राजाराम बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेला एक बारा वर्षाचा शाळकरी मुलगा बुडाला. तर त्याच्या मित्राला वाचवण्यात राजाराम बंधारा ग्रुपच्या कार्यकर्त्यांना यश आले. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या मुलाचा अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांबळे यांनी शोध घेतला. पण तो आढळून आला नाही.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: संस्कार राहुल कुरणे (वय १२ ) रा.कदमवाडी व त्याचा मित्र नजीब नियाज ट्रेनर हे दोघे गेल्या तीन दिवसांपासून घरात आम्ही बाहेर खेळायला जातो असे खोटे सांगून राजाराम बंधारा येथे आंघोळीसाठी येत होते.

जोरदार वाहणार्‍या पंचगंगा नदीतील वाहत्या पाण्याचा या दोघांनाही अंदाज आला नाही. वाहत्या प्रवाहा बरोबरच संस्कार हा बंधाऱ्यातून वाहून गेला. त्याच्या पाठोपाठ नजीब ही वाहतच चालला होता. पण येथे दररोज आंघोळीसाठी येत असलेल्या राजाराम बंधाऱ्याचे सदस्य जीतू केंबळे यांनी त्याला हाताला धरून पाण्याबाहेर काढले.दरम्यान बंधाऱ्याच्या मोरीतून वाहत गेलेल्या संस्कार ला वाचवण्यासाठी नदीत पोहण्यासाठी आलेले राजाराम बंधारा या ग्रुपचे सदस्य संतोष गायकवाड, रावसाहेब शिंदे, जितू केंबळे, हनुमंत सूर्यवंशी यांनी शर्तीचे प्रयत्न केले पण संस्कार वाहत पुढे पुढे जात होता. ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर तो पाण्यात बुडाल्याने दिसायचा बंद झाला.

त्याचा शोध आज दिवसभर अग्निशामक दलाचे जवान तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांबळे यांनी बोटीच्या सहाय्याने घेतला. मात्र आढळून आला नाही. संस्कार हा इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता. त्याच वडील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहेत.दरम्यान राजाराम बंधाऱ्यात मुलगा बुडाल्याच्या घटनेची माहिती सोशल मीडिया वरून वायरल झाल्याने बंधाऱ्यावर लोकांनी खूप गर्दी केली होती. संस्कार च्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. 

टॅग्स :DamधरणAccidentअपघातkolhapurकोल्हापूर