शाळकरी मुलीने करंजीच्या झाडाला घेतला गळफास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 11:05 IST2025-02-24T11:04:22+5:302025-02-24T11:05:18+5:30
गडहिंग्लज येथील घटना

शाळकरी मुलीने करंजीच्या झाडाला घेतला गळफास!
गडहिंग्लज: गडहिंग्लज शहरानजीक असणाऱ्या भडगाव पुलाजवळील करंजीच्या झाडाला ओढणीने गळफास घेऊन शाळकरी मुलीने आपली जीवनयात्रा संपवली.गीता रामा केसरकर ( वय १५, भडगाव ता.गडहिंग्लज ) असे तिचे नाव आहे. सोमवारी सकाळी (२४) ही घटना उघडकीस आली.
गीता ही चन्नेकुप्पी येथील शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती.रविवारी दुपारी ती घरातून निघून गेली होती.शोधाशोध करूनही न सापडल्याने तिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची वर्दी पोलिसांत दिली होती.तिचे वडील गवंडीकाम तर आई मोलमजुरी करते.
सोमवारी सकाळी हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पूलाजवळ तिची बॅग आढळून आली.त्यात काही रक्कम व कोल्हापूर - गडहिंग्लज बस प्रवासाची तिकीटे असल्याचे समजते. नदीकाठावरील करंजीच्या झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. गडहिंग्लज पोलीस अधिक तपास करीत आहेत.