शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

राजारामपुरीत विजेचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 19:39 IST

राजारामपुरी पाचवी गल्ली येथील विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढत असताना विजेचा धक्का बसून शाळकरी मुलगा ठार झाला.

कोल्हापूर - राजारामपुरी पाचवी गल्ली येथील विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढत असताना विजेचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. समर्थ अविनाश चौगुले (वय ११) असे त्याचे नाव आहे. बाहेरुन तुटून आलेला पतंग विजेच्या खांबावर अडकला होता. तो काढण्याचा मोह अखेर समर्थच्या जिवावर बेतला. दिवाळी सणाच्या तोंडावर शनिवारी दूपारी चारच्या सुमारास घडलेल्या दूर्घटणेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक माहिती अशी, समर्थ चौगुले हा सहावी मध्ये शिकत होता. वडील मोटारसायकल दुरुस्तीचा व्यवसाय करतात. आई पुजा कपड्याच्या दूकानात नोकरी करते. लहान भाऊ शुभम हा शाळेला असतो. दिवाळी सुट्टीमुळे शनिवारी घरी आजोबा आणि दोघे भावंडे होते. समर्थच्या घरासमोर विजेचा खांब आहे. तेथून ११ हजार व्होल्टची विद्युत वाहिनी गेली आहे. त्यावर बाहेरुन तुटून आलेला पतंग अडकला होता. त्यावर समर्थची नजर पडताच तो पतंग खाली काढण्यासाठी धडपडू लागला. उंचावर असल्याने सहजासहजी काढता येत नव्हता. त्यामुळे समोरच्या भोरे यांच्या दूमजली घराच्या गच्चीवर तो चढला. हात पोहचत नसल्याने लोखंडी पाईपच्या सहाय्याने पतंग काढण्याचा प्रयत्न करीत असताना विद्युत वाहिनीला पाईचा स्पर्श होताच त्याला जोराचा धक्का बसला. पंधरा फुट उंचावरुन तो खाली कोसळून बेशुध्द पडला.गल्लीमध्ये हा प्रकार लक्षात येताच लोकांनी त्याला तत्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. समर्थचे आई-वडील कामावर गेले होते. त्यांना हा प्रकार समजताच त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. पोटच्या मुलाचा मृतदेह पाहून त्यांचा अक्रोश ºहदय पिळवटून टाकणारा होता. राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू