शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूरचा सार्थक खोत राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:41 IST2018-08-08T00:41:37+5:302018-08-08T00:41:41+5:30

शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूरचा सार्थक खोत राज्यात अव्वल
कोल्हापूर : पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या (पाचवी) राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत कोल्हापुरातील तेजस मुक्त विद्यालयाच्या सार्थक खोत याने ९४.६३ टक्क्यांसह प्रथम, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (आठवी)मध्ये सरस्वती हायस्कूलच्या धनश्री शिवदास हिने ९७.२९ टक्क्यांसह द्वितीय क्रमांक पटकावला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांतील चार विद्यार्थ्यांनी या गुणवत्ता यादीत स्थान पटकविले. राज्य परीक्षा परिषदेतर्फे मंगळवारी सायंकाळी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
आठवीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी : ईशान म्हेत्रे (इचलकरंजी हायस्कूल, तिसरा), सलोनी शिंदे (एस. पी. हायस्कूल, चौथा), वसुंधरा चिले (वसंतराव देशमुख हायस्कूल, पाचवा), योगेश नेजे (इचलकरंजी हायस्कूल, आठवा), दिव्या गुमठणवार (सरस्वती हायस्कूल, नववा), प्रज्ञा मादनाईक (जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर, जयसिंगपूर, अकरावा), मनीष गोरे (व्यंकटराव हायस्कूल, चौदावा), आविष्कार चिगरे, वेदिका बडबडे (इचलकरंजी हायस्कूल, पंधरावा), सिमरन मानकापुरे (जनता माध्यमिक विद्यालय हुपरी), सोनिया कांबळे (इचलकरंजी हायस्कूल, सतरावा), श्रद्धा पाटील (महाराष्ट्र हायस्कूल), तनय पाटील (बळवंतराव यादव हायस्कूल), शिवरुद्रा स्वामी (इचलकरंजी), ओंकार कुलकर्णी (प्रायव्हेट हायस्कूल), वैष्णवी जोके (सरस्वती हायस्कूल, एकोणविसावा क्रमांक) यांचा समावेश आहे.
पाचवी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी (कंसात शाळेचे नाव, राज्य गुणवत्ता यादीतील क्रमांक) : अनीश होनगेकर (श्रीराम विद्यालय, चौथा), वेदांत पाटील (शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेज, सातवा), साईराज पाटील (ल. कृ. जरग विद्यामंदिर, सातवा), मयूरा कालेकर (श्री दत्त विद्यामंदिर, कागल, सातवा), संजना होडगे (सरस्वती हायस्कूल, दहावा), ओंकार बिक्कड (ल. कृ. जरग विद्यामंदिर, दहावा), अथर्व हावळ (मराठी माध्यम हायस्कूल इचलकरंजी, दहावा), राधा कोठावळे (प्रायव्हेट हायस्कूल), ओम देसाई (भाऊ जगदाळे विद्यालय, अकरावा), राजवर्धन फडतारे (ल. कृ. जरग विद्यामंदिर, तेरावा), साईराज तिवले (तेजस मुक्त विद्यालय), साकीब अत्तार (शिवराज विद्यालय, पंधरावा).