लघुपटांतून स्त्री शक्तीचे दर्शन
By Admin | Updated: March 8, 2017 16:23 IST2017-03-08T16:23:35+5:302017-03-08T16:23:35+5:30
महिला दिनानिमित्तकोल्हापूर बार असोसिएशनतर्फे आयोजन

लघुपटांतून स्त्री शक्तीचे दर्शन
लघुपटांतून स्त्री शक्तीचे दर्शन महिला दिनानिमित्त आयोजन कोल्हापूर : आपली सोशिक प्रतिमा मोडून अन्यायला प्रतिक ार करीत नवा पायंडा पाडून स्वत:च्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणाऱ्या स्त्रीचे दर्शन बुधवारी लघुपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी अनुभवले. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व प्रोग्रेसिव्ह लॉयर्स असोसिएशनतर्फे न्यायसंकुलातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात महिला दिनानिमित्त लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी दयान इंग दिग्दर्शित बस नं ४४,बॅट शेवा गुईज दिग्दर्शित ‘बिहार्इंड द वॉल’,अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘दॅट डे आफ्टर एव्हरीडे’ हे तीन लघुपट दाखविण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. जी. अवचट, अॅड. प्रकाश मोरे, मलिंद कदम, सुनील धुमाळ, मेघा पाटील, विजय लंबोरे, अजित चव्हाण आदी उपस्थित होते. लिफ्टमध्ये अडकून पडलेली मुस्लिम नकाब घेतलेली महिला व एक परदेशी गोरा पर्यटक यांच्यावर आधारित पारंपरिक रूढीवादी विचारांना धक्का देणारा, कपड्यांवरून माणसांची पारख करू नये, असा संदेश ‘बिहार्इंड द वॉल’ हा तुर्की देशातील लघुपट देतो. त्यानंतर चायनीज भाषेतील बस नं ४४ हा लघुपट दाखविण्यात आला. त्यामध्ये समाजाच्या षंढ प्रवृत्तीला धडा शिकविण्यासाठी स्त्री किती टोकाचा निर्णय घेऊ शकते याची प्रचिती या कलाकृतीमधून आली. काही प्रश्न हे सरकारे बदलली. सरकारने उपाययोजना केल्या सुरक्षेत वाढ केली म्हणून सुटणारच नाहीत. ते सोडवायचे असतील तर प्रत्येकाने स्वतपासुनच सुरवात करावी लागेल. अशाच एका प्रश्नाचं उत्तर शोधणारा लघुपट म्हणजे ‘दॅट डे आफ्टर एव्हरीडे’. प्रत्येकवेळी स्त्रीला तु कमकुवत आहेस असे घरापासूनच जाणिव करुन दिल्याने त्या समाजातील दृष्ट प्रवृत्तींना विरोध करण्यास कचरत असतात. परंतु जेव्हा त्या भितीवर मात करुन जेव्हा छेडछाडीविरोधात उभ्या राहतात तेव्हा मात्र त्यांच्या शक्तीपुढे दृष्टांना झुकावेच लागते असा संदेश हा लघुपट देतो. या लघुपट महोत्सवाला न्यायाधीश, महिला वकील, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.