..म्हणे शिवसेना कार्यालय बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:26 IST2021-03-16T04:26:46+5:302021-03-16T04:26:46+5:30

बेळगाव : महापालिकेसमोर अनधिकृत लाल-पिवळा ध्वज उभारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या गाडीवर हल्ला करणे आदी उपद‌्व्याप करून अशांतता निर्माण ...

..Say the Shiv Sena office closed | ..म्हणे शिवसेना कार्यालय बंद करा

..म्हणे शिवसेना कार्यालय बंद करा

बेळगाव : महापालिकेसमोर अनधिकृत लाल-पिवळा ध्वज उभारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या गाडीवर हल्ला करणे आदी उपद‌्व्याप करून अशांतता निर्माण केल्यानंतर आता कन्नड संघटनांनी बेळगावातील शिवसेनेचे कार्यालय बंद करा, अशी कोल्हेकुई सुरू केली आहे.

कन्नड संघटनांच्या क्रिया समितीने बेळगावातील शिवसेनेचे कार्यालय बंद करावे, अशी मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात लाल-पिवळा झेंडा फेम श्रीनिवास ताळुकर याच्याप्रमाणे कन्नड संघटनेचे नेते अशोक चंदरगी यांच्या नेतृत्वाखाली कन्नड संघटनांच्या क्रिया समितीतर्फे सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या ज्या वाहनाच्या फलकाची मोडतोड करण्यात आली ते वाहनाच जप्त करावे. त्याचप्रमाणे बेळगावातील शिवसेनेचे कार्यालय बंद करावे, अशी मागणी करण्यात आली.

फोटो-बेळगावचे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांना निवेदन देताना कन्नड संघटनेचे कार्यकर्ते.

Web Title: ..Say the Shiv Sena office closed