स्त्रियांना साक्षर, सक्षम बनवण्यासाठी सावित्रीबाई फुलेंचे मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:48+5:302021-01-08T05:15:48+5:30
कोल्हापूर : जाती-पातीच्या संकल्पनेच्या बाहेर जाऊन स्त्रियांना साक्षर आणि सक्षम बनवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन प्राचार्य ...

स्त्रियांना साक्षर, सक्षम बनवण्यासाठी सावित्रीबाई फुलेंचे मोठे योगदान
कोल्हापूर : जाती-पातीच्या संकल्पनेच्या बाहेर जाऊन स्त्रियांना साक्षर आणि सक्षम बनवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन प्राचार्य विद्या साळोखे यांनी केले. शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्यावतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील होत्या. यावेळी कोरोना योद्धा शुभांगी इंजल यांचा सत्कार करण्यात आला. विवाहानंतर अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पत्नीला सहकार्य केल्याबद्दल आनंदराव साळोखे, प्रमोद म्हात्रे, सुजाता म्हात्रे, ॲड. सरिता पिंपळे, प्रिया सुनील जाधव यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. याचबरोबर भाकपचे सतीश कांबळे, पत्रकार सुनंदा मोरे यांचा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.