चिखलात अडकलेल्या कांडेसर पक्षाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:38+5:302021-06-27T04:17:38+5:30
देवाळे : सातवे (ता. पन्हाळा) येथील वैरणीला गेलेल्या शशिकांत रंगराव निकम यांनी चिखलात अडकून पडलेल्या कांडेसर पक्षाला ...

चिखलात अडकलेल्या कांडेसर पक्षाला जीवदान
देवाळे :
सातवे (ता. पन्हाळा) येथील वैरणीला गेलेल्या शशिकांत रंगराव निकम यांनी चिखलात अडकून पडलेल्या कांडेसर पक्षाला जीवदान दिले.
या पक्षाच्या चोचीत कापड अडकले होते. ते काढत असताना त्याचे पंखही चिखलात अडकले. त्या पक्षाची केविलवाणी धडपड शशिकांत यांच्या लक्षात आली. ते हळूच त्या पक्षाजवळ गेले. त्यांनी विळ्याने ते कापड अलगद कापले व त्याची चोच व पंख मोकळे केले. त्या पक्षाने आनंदाने आकाशात उंच भरारी घेतली. शशिकांतच्या निसर्ग व प्राणीप्रेमाबद्दल त्याचे परिसरात कौतुक होत आहे.