शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कोल्हापुरात भाजपला धक्का, सत्यजित कदम शिंदेसेनेत प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 12:22 IST

कोल्हापूर : ‘उत्तर’च्या २०२२ साली झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सत्यजित ऊर्फ नाना कदम हे आज शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार ...

कोल्हापूर : ‘उत्तर’च्या २०२२ साली झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सत्यजित ऊर्फ नाना कदम हे आज शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपला हा मोठा धक्का असून विधानसभा उमेदवारीच्या राजकारणातूनच कदम यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. आपल्या सर्व समर्थकांना संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या महायुतीच्या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही कदम यांनी केले आहे. काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसला होता, तर आता कदम यांच्या प्रवेशाने भाजपला धक्का बसणार आहे.कदम हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे आहेत. ते २०१० ते २०२० या कालावधीत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महापालिकेत त्यांना मानणारे काही नगरसेवक असून याच बळावर त्यांनी २०१४ साली कॉंग्रेसकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यांना ४७ हजार ३१५ मते मिळाली. भाजपच्या उमेदवारापेक्षा त्यांना ७ हजाराहून अधिक मते होती. अशातच २०१४ साली भाजप-शिवसेना सत्तेवर आल्यानंतर भाजप आणि महाडिक यांच्या ताराराणीच्यावतीने ३० हून अधिक नगरसेवक निवडून आले. त्यांचे नेतृत्व कदम करत होते. त्यातूनच २०२२ साली झालेल्या ‘उत्तर’च्या पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यात आली; परंतु ७८ हजार मते मिळूनही कदम यांना पराभव स्वीकारावा लागला. आताही ते इच्छुक होते; परंतु खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे चिरंजीव कृष्णराज यांचे नाव पुढे आणल्याने ते नाराज होते. यातूनच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची २७ ऑक्टोबरला भेट घेतली आणि याठिकाणी राजेश क्षीरसागर आणि कदम यांच्याशी चर्चा करून त्यांना विधान परिषदेवर किंवा राज्य नियोजन मंडळ कार्याध्यक्षपदाचा शब्द देण्यात आला. त्यावेळच्या चर्चेनुसार कदम आज काही मोजक्या सहकाऱ्यांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024