सतेज पाटील यांनी घेतला क्रिकेट खेळाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST2021-02-05T07:10:28+5:302021-02-05T07:10:28+5:30
कोल्हापूर : पोलीस मुख्यालय येथील ‘कल्पतरू’ पोलीस सबसीडीअरी कॅन्टिन विस्तारीकरण व नूतनीकरण समारंभ पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते ...

सतेज पाटील यांनी घेतला क्रिकेट खेळाचा आनंद
कोल्हापूर : पोलीस मुख्यालय येथील ‘कल्पतरू’ पोलीस सबसीडीअरी कॅन्टिन विस्तारीकरण व नूतनीकरण समारंभ पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंत्री पाटील यांनी क्रिकेट मैदानाच्या उद्याटनप्रसंगी क्रिकेट खेळाचाही आनंद घेतला. ‘कल्पतरू’ पोलीस सबसीडीअरी कॅन्टिनमध्ये पोलीस, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी चे अधिकारी, पोलीस तसेच निवृत्त पोलीस यांना सवलतीच्या दरात गृहोपयोगी किराणा साहित्य, वस्तू तसेच इलेक्ट्राॅनिक साहित्य मिळणार आहे.
या सोहळ्यानंतर मंत्री सतेज पाटील यांनी पोलीस मैदानावर उभारलेल्या अद्ययावत क्रिकेट प्रॅक्टीस मैदानाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी काहीवेळ क्रिकेट खेळाचा आनंद घेतला. प्रसंगी कोल्हापूर पोलीस कॅन्टिनचे अधिकाधिक साहित्य खरेदी करावे, चांगल्या आरोग्यासाठी पोलीस मैदान व्यायाम शाळेत व्यायाम करावा असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
फोटो नं. २७०१२०२१-कोल-पोलीस०३
ओळ : पोलीस मैदानावर उभारलेल्या अद्ययावत क्रिकेट प्रॅक्टिस मैदानाच्या उद्घाटनसमयी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काहीवेळ क्रिकेट खेळाचा आनंद घेतला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपिस्थत होते.
फोटो नं. २७०१२०२१-कोल-पोलीस०४
ओळ : कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने पोलीस मुख्यालय येथील कल्पतरू पोलीस कॅन्टिन विस्तारीकरण व नूतनीकरणाच्या उद्घाटनानंतर त्यांनी कॅन्टिनची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.