शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : जिल्हा परिषद चौक होणार पाणीमुक्त, नागरिकांत समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 14:35 IST

पावसाळ्याच्या दिवसांबरोबरच इतर दिवशीही येथील जिल्हा परिषद चौकात रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही समस्या या पावसांत होणार नाही, असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्हा परिषद चौक होणार पाणीमुक्त, नागरिकांत समाधान  पाणी साचून राहत असल्यामुळे रस्त्याचे होत होते नुकसान

सातारा : पावसाळ्याच्या दिवसांबरोबरच इतर दिवशीही येथील जिल्हा परिषद चौकात रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही समस्या या पावसांत होणार नाही, असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.जिल्हा परिषद चौकातील साठणाऱ्या पाण्याविषयी मार्च २०१७ ला जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते. त्या निवेदनाबरोबरच येथील स्थानिक कपिल राऊत यांनी दोनवेळा आपले सरकार या पोर्टलवर याविषयी तक्रारही केली होती. सर्वच स्तरांवर या विषयाचा बोलबोला झाल्यामुळे शासनस्तरावर याची दखल घेतली गेली.

हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गी लावले असून, येत्या महिनाभरात हे काम सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. या चौकातील गटार नव्याने बांधण्यात येणार असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविले आहे.

याचा अंदाजित खर्च तीस लाख रुपये आहे. त्यामुळे विसावा नाका ते जिल्हा परिषद चौकात पाणी साचून राहणार नाही. याच परिसरात असणाऱ्या विजय हॉटेलच्या समोरच्या रस्त्यालगत २-३ खड्डे आहेत, तेही मुजवून घेणार आहेत.चौकात साठणाऱ्या पाण्याबरोबरच चौकातील सिग्नल यंत्रणेत टायमर नसल्याने सिग्नल संपलेला लक्षात येत नव्हता. याविषयीही स्थानिकांनी तक्रार केली होती. ते कामपण मार्गी लागले आहे. याबाबतीत नगरपालिकेतील कर्मचारी महेश सावळकर यांनी सहकार्य केल्याची माहिती कपिल राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदRainपाऊसcollectorतहसीलदार