शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सातारा ते कागल महामार्ग : महामार्गाच्या सहापदरीकरणाचे नव्याने सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:44 IST

तानाजी पोवार कोल्हापूर : रोज किमान ६० ते ६५ हजार वाहनांची वर्दळ असणाऱ्या सातारा ते कागल या राष्ट्रीय  महामार्गाचे ...

ठळक मुद्देसातारा ते कागल महामार्ग : महामार्गाच्या सहापदरीकरणाचे नव्याने सर्वेक्षणसुधारित प्रस्ताव राष्ट्रीय रस्ते विकास महामार्गाकडे

तानाजी पोवारकोल्हापूर : रोज किमान ६० ते ६५ हजार वाहनांची वर्दळ असणाऱ्या सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता नुकतीच संपल्याने सहापदरीकरण सर्वेक्षण, निविदा प्रक्रियेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तसा सुधारित प्रस्ताव नुकताच राष्ट्रीय रस्ते विकास महामार्गकडे पाठविला आहे.

सहापदरीकरण कामासाठी गेल्या दीड वर्षात तब्बल २२ वेळा निविदाचे शुद्धिकरण करून अखेर ती रद्दबातल ठरविल्याने आता नव्याने श्रीगणेशा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.सातारा ते कागल या सुमारे १३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाची प्रतीक्षा वाहनधारकांना लागली आहे.

डिसेंबर २०१७ ते मे २०१९ पर्यंत फक्त निविदांच्या फेºयात अडकून सहापदरीकरणाचा कागदोपत्री खेळ राष्ट्रीय रस्ते विकास महामार्गाने केल्याने वाहनधारकांतून संतापाची लाट उमटत आहे. संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा हा मुंबई ते चेन्नई सुमारे १४१९ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ आहे.

संपूर्ण महामार्गावर सातारा ते कागल वगळता इतर महाराष्ट्र व कर्नाटक हद्दीतील सहापदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या दीड वर्षात सातारा ते कागल या सहा पदरीकरणासाठी तब्बल २२ वेळा शुद्धिपत्रक निविदा प्रक्रिया राबविली. अखेर मे २०१९ मध्ये कामाच्या खर्चाचा आकडा फुगल्याने निविदा प्रक्रियाच रद्दबातल ठरविली.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे काम पुन्हा प्रलंबित ठेवण्याचा प्रताप केला आहे; पण आता निवडणुकीची आचारसंहितही संपली, त्यामुळे रस्ते कामासाठी नव्याने ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्यामुळे सातारा ते कागल या सहापदरीकरणाच्या कामासाठी नव्याने सर्वेक्षण, निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभाग (एनएचएआय) यांच्याकडे पाठविला आहे.वाद टोल आकारणी, कामाच्या दर्जाचापुणे ते बंगलोर या राष्ट्रीय महामार्ग (जुना नंबर- एन.एच.४)चे चौपदरीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने (एमएसआरडीसी) २००५ ला पूर्ण केले. त्यामुळे एमएसआरडीसी आणि एमएचएआय या दोघांतील करारानुसार या रस्त्याची देखभाल दुरुस्ती व २०२२ पर्यंत टोल आकारणीची जबाबदारी ‘एमएसआरडीसी’ची आहे. त्यानंतर संपूर्ण महामार्गाचे २०२२ पर्यंत सहापदरीकरण पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसीने पाऊल उचलले.मुंबई ते पुणे तसेच कागल ते बंगलोरचे काम पूर्ण झाले. २०१४ मध्ये भाजप मित्रपक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुणे ते सातारा हे सहापदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने (एमएचएआय) केले.

या कामाची तुलना कागल ते बंगलोर सहापदरीकरणाशी झाली. त्यामुळे पुणे ते सातारा कामाचा निकृष्ट दर्जा चव्हाट्यावर आला. हा वादाचा मुद्दा ठरून काम रखडले. उर्वरित सातारा ते कागल हा रस्ता सहापदरीकरण ‘एमएचएआय’ने पूर्ण केल्यास पुढील २०२२ पर्यंत टोल कोणी आकारायचा हा मुद्दाही वादाचा ठरत आहे.पुणे ते चेन्नई (बंगलोर) रस्ता

  • २००२ : दुपदरीकरण पूर्ण
  •  २००५ : चौपदरीकरण पूर्ण
  • २०१४ : सहापदरी रस्ताकाम पूर्ण (सातारा ते कागल वगळता)
  • २०२२ पर्यंत टोलवसुलीची मुदत

 

 

टॅग्स :highwayमहामार्गkolhapurकोल्हापूर