सातारची पथके कोल्हापुरात
By Admin | Updated: February 21, 2015 23:45 IST2015-02-21T23:25:32+5:302015-02-21T23:45:42+5:30
कोल्हापूर पोलिसांना तपासात मदत

सातारची पथके कोल्हापुरात
सातारा : कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यापासून सातारमधील दहशतवादविरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम कोल्हापुरात तळ ठोकून आहे. या दोन टीम कोल्हापूर पोलिसांना तपासात मदत करत आहेत.
साताऱ्यातील दहशवादविरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम कोल्हापूर पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत आहे. साताऱ्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही गुन्हेगारांची नावेही त्यांनी कोल्हापूर पोलिसांना दिली आहेत. त्या गुन्हेगारांकडेही पोलीस चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)