केदार्लिंग सेवा संस्थेच्या सभापतीपदी साताप्पा चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:33+5:302021-05-12T04:25:33+5:30

यावेळी बोलताना सरपंच गणपतराव फराकटे म्हणाले, केदार्लिंग सेवा संस्थेने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवून हातभार लावला आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी ...

Satappa Chavan as the Chairman of Kedarling Seva Sanstha | केदार्लिंग सेवा संस्थेच्या सभापतीपदी साताप्पा चव्हाण

केदार्लिंग सेवा संस्थेच्या सभापतीपदी साताप्पा चव्हाण

यावेळी बोलताना सरपंच गणपतराव फराकटे म्हणाले, केदार्लिंग सेवा संस्थेने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवून हातभार लावला आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या लौकिकास साजेसा कारभार करून संस्था प्रगतिपथावर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.

नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच गणपतराव फराकटे, माजी पं.स. सदस्य रघुनाथ कुंभार, मावळते सभापती पांडुरंग खाडे, उपसभापती बाळासाहेब फराकटे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संचालक शिवाजी फराकटे, नानासाहेब साठे, सुभाष साठे, आनंदा फराकटे, विश्वास डवरी, गणपती कांबळे, पुष्पा जोंधळे, छाया घोरपडे यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

सचिव राजेंद्र जाधव यांनी स्वागत केले. उपसभापती पंडित सूर्यवंशी यांनी आभार मानले.

फोटो

..............

बोरवडे : येथील केदार्लिंग सेवा संस्थेच्या नूतन सभापती, उपसभापतींचा सत्कार करताना बिद्रीचे संचालक गणपतराव फराकटे, माजी पं.स. सदस्य रघुनाथ कुंभार, पांडुरंग खाडे, बाळासाहेब फराकटे आदी.

Web Title: Satappa Chavan as the Chairman of Kedarling Seva Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.