सरवडे ग्रामपंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी घेतला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:23+5:302021-03-31T04:24:23+5:30
स्वच्छता मोहिमेअंतर्गत या ग्रामपंचायतीने गेली तीन वर्षे घरातील कचरा गोळा करण्याचा उपक्रम राबविला आहे. अर्जुन कुंभार यांना हा ठेका ...

सरवडे ग्रामपंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी घेतला ट्रॅक्टर
स्वच्छता मोहिमेअंतर्गत या ग्रामपंचायतीने गेली तीन वर्षे घरातील कचरा गोळा करण्याचा उपक्रम राबविला आहे. अर्जुन कुंभार यांना हा ठेका दिला होता. आठवड्यातून एकदा ते प्रत्येक गल्लीत जाऊन कचरा गोळा करतात. ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगाचा फंड उपलब्ध झाल्याने नवीन ट्रॅक्टर-ट्रॉली घेतली असून त्या मार्फत कचरा गोळा केला जाणार आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य आर. के. मोरे, सुधा विजय व्हरकट, पांडुरंग वागवेकर, तानाजी कुंभार, अरुण मोरे, किरण गुरव, दिग्विजय मोरे, घनश्याम पाटील, श्रीकांत पाटील, युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास् अधिकारी एम. जी. बोटे, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. महादेव पाटील यांनी स्वागत केले. संभाजी पाटील यांनी आभार मानले.