शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आपलं गावच भारी!, कोल्हापूरच्या हद्दवाढविरोधात ४२ गावांचे सरपंच पाचगावात एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:13 IST

विश्वासात न घेता हद्दवाढ लादल्यास आंदोलनाचा इशारा

पाचगाव : शहरालगत असणाऱ्या गावांच्या हद्दवाढविरोधात ४२ गावांचे सरपंच, उपसरपंच व सदस्य रविवारी पाचगावमध्ये एकवटले. यावेळी हद्दवाढविरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. कोल्हापूर शहराच्या बकालपणाला जबाबदार कोण? असा लावण्यात आलेला मोठा फलक यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.यावेळी पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील म्हणाले, शहराचा विकास अगोदरच खुंटला आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून १५वा वित्त आयोग असेल तसेच २५/१५ वित्त आयाेग असेल याचा शासन स्तरावर पाठपुरावा करून अनेक विकासकामे करता येतात. परंतु महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यास ४२ गावांतील शेती संपुष्टात येईल. याला जबाबदार कोण. त्यामुळे ही हद्दवाढ कदापिही करू देणार नाही. हद्दवाढ लादण्याचा प्रयत्न केला रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू.यावेळी उचगावाचे सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांच्यासह अन्य गावांतील सरपंचांनी आपापली मते मांडली. यावेळी कळंबा, मोरेवाडी, वडणगे, सरनोबतवाडी, बालिंगा, वळिवडे, गांधीनगर, पिरवाडी, कंदलगाव, गडमुडशिंगी, गोकुळ शिरगाव, शिंगणापूर व आंबेवाडी या गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच हद्दवाढविरोधी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.आपलं गावच भारीशहरातील कचरा, पाणी प्रश्न, रस्ते यासह वाहतूक कोंडी, आरोग्य व्यवस्था यांचा विचार करता ''आपलं गाव भारी ''असे म्हणावे लागेल. हा सूर आज बेचाळीसगावच्या सरपंच बैठकीत उमटला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsarpanchसरपंचagitationआंदोलन