पन्हाळ्याच्या अंबाबाईची सप्तमीला तिरुपती रुपात पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 18:10 IST2017-09-27T18:09:52+5:302017-09-27T18:10:02+5:30

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त पन्हाळा येथील अंबाबाईच्या मूर्तीची बुधवारी तिरुपतीच्या रुपातील सालंकृत पूजा महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले, अमृत चरणकर यांनी बांधली.

Saptami of Ambabai of Panhala worshiped as Tirupati | पन्हाळ्याच्या अंबाबाईची सप्तमीला तिरुपती रुपात पूजा

पन्हाळ्याच्या अंबाबाईची सप्तमीला तिरुपती रुपात पूजा

कोल्हापूर 27 : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त पन्हाळा येथील अंबाबाईच्या मूर्तीची बुधवारी तिरुपतीच्या रुपातील सालंकृत पूजा महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले, अमृत चरणकर यांनी बांधली.


सातव्या माळेला देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत पन्हाळा येथील अंबाबाई मंदिरात सकाळी अभिषेक, सायंकाळी महिला मंडळामार्फत भजन, जोगवा असे विविध कार्यक्रम झाले. नीळकंठ मोघे यांनी पौराहित्य केले.


आठव्या माळेला, उद्या गुरुवारी ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजता अंबाबाई मंदिरापासून प्रदक्षिणेला प्रारंभ होणार आहे. यावेळी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत करण्यात आले आहे.

 

 

Web Title: Saptami of Ambabai of Panhala worshiped as Tirupati