शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘शिवछत्रपती’ हे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत, आम्हांला तोंड उघडायला लावू नका-संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 14:31 IST

त्यांनी किती पक्ष बदलले? पक्षाचे काय वावटे आहे का? तुमच्या घराण्यातील किती जणांनी पक्ष बदलले. आम्हांला तोंड उघडायला लावू नका असा इशाराच शिवेंद्रराजे भोसलेंना दिला.

कोल्हापूर : छत्रपतींच्या गादीबद्दल प्रेम आहे आणि राहिल. परंतू राज्यसभेबाबतचा विषय संपला असल्याचे खासदार संजय राऊतांनी आज, कोल्हापुरात स्पष्ट केले. यावेळी शिवसेना हा छत्रपती घराण्याला आदर देत नसल्याचा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला असता, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या एकट्याच्या मालकीचे नाहीत. ते संपुर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत हे लक्षात घ्या असेही ते म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.दरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवसेनेने संभाजीराजेंचा गेम केल्याची टीका केली होती याबाबत राऊतांना सवाल करण्यात आला. यावर राऊतांनी ते अपक्ष आहेत का? असा सवाल केला. त्यांनी किती पक्ष बदलले? पक्षाचे काय वावटे आहे का? तुमच्या घराण्यातील किती जणांनी पक्ष बदलले. आम्हांला तोंड उघडायला लावू नका असा इशाराच शिवेंद्रराजे भोसलेंना दिला.चंद्रकांत पाटील छत्रपतींचे वंशज आहेत का?शरद पवार आणि ठाकरे यांच्यावर रोज टीका करणाऱ्यांची मन शुध्द नाहीत. ही एक विकृती आहे. त्यात त्यांना काय आनंद मिळतो कोणास ठाऊक असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाबाबत विचारल्यानंतर ते छत्रपतींचे वंशज आहेत का अशी विचारणा राऊतांनी केली.सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुढची २५ वर्षे उध्दव ठाकरेंच मुख्यमंत्रीआज सरकारला अडीच वर्षे झाली. आम्ही अडीच घर चाललो, पुढचीही अडीच चालणार. पुढची २५ वर्षे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री राहणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पुढच्या सर्व निवडणुकांसाठी शिवसैनिकांना तयार रहा हा संदेश देण्यासाठी ही मोहिम आहे.मलिक यांचे अभिनंदननबाब मलिक यांनी आयर्न ड्रग्ज प्रकरण लावून धरले आणि भाजपचा बुरखा फाडला. याबद्दल मी मलिक यांचे अभिनंदन करतो. राजकीय दबावाखाली ज्या पध्दतीने एजन्सी हे सर्व सूडबुध्दीने चालले आहे. एक अधिकारी युवकाचं करिअर उध्वस्त करतो. आता हे केंद्र सरकारला दिसत नाही असा असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSanjay Rautसंजय राऊतSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले