शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, अन्यथा अधिवेशनात सरकारचे कामकाज चालू देणार नाही: चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 17:18 IST

chandrakant patil Kolhapur- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांची चौकशी करून त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात सरकारचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.

ठळक मुद्देसंजय राठोड यांचा राजीनामा घ्या: चंद्रकांत पाटीलअन्यथा अधिवेशनात सरकारचे कामकाज चालू देणार नाही: चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांची चौकशी करून त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात सरकारचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई का केली नाही, तसेच या प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या भाजपच्या चित्रा वाघ यांच्या पतीची चौकशी आत्ताच का सुरू होतेय, असा प्रश्न उपस्थित करून आम्ही घाबरणार नाही. चित्रा वाघ या वाघीण आहेत, भाजपा पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठिशी आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना पाटील म्हणाले, या सरकारमधील मंत्र्यांवरील आणि पक्षातील नेत्यांवर असलेल्या आरोपांची प्रकरणं दाबण्यात येत आहेत. धनंजय मुंडे प्रकरणात कारवाई झालेली नाही, एका मंत्र्यांच्या जावयाला ड्रग्जमध्ये पकडलं, त्यावरही कारवाई केली नाही. एका मंत्र्याने कार्यकर्त्याला घरी जाऊन मारले, त्यावरही कारवाई केलेली नाही.

एका पक्षाच्या युवक अध्यक्षावर बलात्काराचा आरोप असूनही त्याच्यावर कारवाई झाली नाही. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या भाजपच्या चित्रा वाघ यांच्या पतीची चौकशी आत्ताच का सुरू होतेय, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.कार्यकर्त्यांवर, पक्षाच्या नेत्यांवर अशाप्रकारच्या कितीही कारवाई केल्या तरी आम्ही घाबरणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाSanjay Rathodसंजय राठोडkolhapurकोल्हापूर