शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मंडलिक- माने येत्या सोमवारी तर शाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार; शक्तिप्रदर्शनाची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 12:19 IST

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती दिनांक १६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार ...

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती दिनांक १६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे.अर्ज भरण्यासाठीची रॅली ऐतिहासिक दसरा चौकातून निघणार असून, यावेळी इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे बहुतांशी नेते उपस्थित राहणार आहेत. शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात, संजय राऊत हे विविध ठिकाणी सभा घेणार आहेत.मंडलिक- माने सोमवारी भरणार अर्जमहायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगलेचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज सोमवार, दि. १५ एप्रिल दाखल करण्यात येणार आहेत. या दोघांचाही अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी महायुतीने सुरू केली आहे. महायुतीचे जिल्ह्यातील सर्व नेते एकाच व्यासपीठावर येणार असून तसे नियोजन सुरू करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित राहणार असून पुण्याहून मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील अर्ज दाखल करताना येणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४kolhapur-pcकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीsanjay mandlikसंजय मंडलिकdhairyasheel maneधैर्यशील माने