शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

संजय मंडलिकांनी शाहू महाराजांची माफी मागावी; सतेज पाटलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 19:43 IST

काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनीही आता संजय मंडलिकांनी शाहू महाराजांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असे वादग्रस्त वक्तव्य महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनीही आता संजय मंडलिकांनी शाहू महाराजांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

शाहू छत्रपती दत्तक, कोल्हापूरची जनता खरी वारसदार, संजय मंडलिकांच्या वक्तव्याने खळबळ

"शाहू महाराज यांच्याबद्दल वैयक्तिक टीका कोणीही करणार नाही असं  या निवडणुकीची सुरुवात झाली तेव्हा चंद्रकांतदादा पाटील, मुश्रीफ साहेब यांनी पेपरमध्ये सांगितलं होतं. या पद्धतीच्या सूचना देऊन सुद्धा संजय मंडलिक यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या रणांगणात लाखाच्या पुढ लीड वाढत चाललं आहे हे दिसून आल्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत. त्यांनी वक्तव्य पाठिमागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.  

या वक्तव्याच उत्तर कोल्हापूरातील लोक मतांद्वारे देतील. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. हे कोल्हापूरकरांना पटलेलं नाही, खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असाल तर जनता योग्य उत्तर देईल, शाहू प्रेमी या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतील. या वक्तव्याचा निषेध महाराष्ट्रातील उमटतील. त्यांच्यापाठिमागे बोलवता धनी कोण आहे हे त्यांनी शोधावे, मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, असंही सतेज पाटील म्हणाले. 

संजय मंडलिकांचे वक्तव्य काय?

आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असे वादग्रस्त वक्तव्य महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले आहे. नेसरी ता. गडहिंग्लज येथे बुधवारी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. या सभेत बोलताना मंडलिक म्हणाले, माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. आखाड्यात उतरल्यानंतर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही. त्या मल्लाला टांगच मारायची नाही. मग कुस्ती तरी कशी होणार अशी विचारणा करत मंडलिक यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे. 

संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवार संतापले

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही गोष्ट नवी नाही. त्यांच्यावर भाष्य केलं म्हणजे विरोधकांनी किती खालची पातळी गाठली ते पाहावं. मूळ शाहू महाराजांचा सेवेचा गुण होता, तीच भूमिका आत्ताच्या शाहू महाराजांनी घेतली आहे. अशा व्यक्तिमत्वावर टीका केली जात आहे. यातून विरोधकांची मानसिकता दिसून येत आहे असा टोला शरद पवारांनी लगावला. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sanjay Mandalikसंजय मंडलिक