कोल्हापूर : जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन अर्थात ‘जितो’ या संस्थेच्या चेअरमनपदी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांची निवड झाली आहे. घोडावत यांनी उद्योग क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांची निवड करण्यात आली.घोडावत यांनी शिक्षण क्षेत्रात आपली कामगिरी योग्यरीत्या बजावली आहे. त्यांनी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले असून, तेथे १३ हजारांहून अधिक विद्यार्थी आपले भवितव्य घडवीत आहेत.माझ्या कारकिर्दीत ही निवड अतिशय मोलाची आहे. या संस्थेच्या माध्यमातून राष्टÑीय व आंतरराष्टÑीय स्तरावर शैक्षणिक तसेच औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, अशी प्रतिक्रिया संजय घोडावत यांनी व्यक्तकेली.
‘जितो’च्या चेअरमनपदी संजय घोडावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 04:29 IST