शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: भाजप प्रवेशाने संजय घाटगे गटाला मिळणार उभारी, समरजीत घाटगे यांची गोची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:19 IST

जे एस शेख  कागल : तालुक्याच्या राजकारणात चिवट आणि लढाऊ कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून अनेक वर्षे मातब्बराबरोबर राजकीय संघर्ष ...

जे एस शेख कागल : तालुक्याच्या राजकारणात चिवट आणि लढाऊ कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून अनेक वर्षे मातब्बराबरोबर राजकीय संघर्ष करणारे माजी आमदार संजय घाटगे यांनी आता तडजोडीच्या राजकारणाचे पुढील पाऊल टाकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुळातच गटातटाच्या राजकारणास महत्त्व असलेल्या कागल तालुक्यात या प्रवेशाने फार काही समीकरणे बदलणार नाहीत. मात्र, संजय घाटगे गटाला देशात व राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाचा मोठा फायदा होणार आहे.तालुक्यातील मुश्रीफ गट ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) मंडलिक गट ( शिवसेना- शिंदे गट) हे सत्तेचे वाटेकरी असून आता यात संजय घाटगे गटाची भर पडली आहे. विधानसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात संजय घाटगे व अंबरिष घाटगे सर्वांत पुढे होते. त्यामुळे मुश्रीफांना मिळणाऱ्या सत्तेचा लाभ त्यांना होत होताच पण आता थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधता येणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पक्षप्रवेशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.कमळ फुलवण्याची संधीप्रतिकूल राजकीय परीस्थितीत संजय घाटगे यांनी आपला राजकीय गट टिकवून ठेवला आहे. त्यांचे पुत्र अंबरीष घाटगे हे तरुणांच्या मध्ये लोकप्रिय आहेत. अन्नपुर्णा साखर कारखाना, गोकुळ व जिल्हा बॅक संचालक ही पदे आहेत. त्यामुळे भाजपाला कागल विधानसभा मतदारसंघात लहान मोठ्या निवडणुकीत कमळ फुलविण्याची संधी लाभणार आहे. हसन मुश्रीफांना नैसर्गिक युतीचा फायदा होत असतांना संजय मंडलिकांच्यावर अदृष्य दबाव येणार आहे.राजे गटाची गोचीमहायुतीत अजित पवार गट सहभागी झाल्यापासून समरजीत घाटगे यांची राजकीय गोची सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध जुळले होते. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवार गटातील त्यांचा प्रवेश राज्यभर चर्चेत आल्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास खडतर बनला आणि आता संजय घाटगेंनी आधीच सीट धरली आहे. अधूनमधून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशी चर्चा होते. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्याचे काम समरजीत घाटगेंना करावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलBJPभाजपाSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफ