चावरेत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ मंजुरी आदेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:41 IST2021-02-18T04:41:40+5:302021-02-18T04:41:40+5:30

नवे पारगाव : चावरे (ता. हातकणंगले ) येथील शासनाच्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती योजना लाभार्थ्यांना मंजुरी आदेश ...

Sanjay Gandhi Niradhar and Shravanbal sanction order allotment in Chawre | चावरेत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ मंजुरी आदेश वाटप

चावरेत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ मंजुरी आदेश वाटप

नवे पारगाव : चावरे (ता. हातकणंगले ) येथील शासनाच्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती योजना लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटले. सरपंच शारदा गुरव अध्यक्षस्थानी होत्या.

संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, मंडल अधिकारी अनिता खाडे यांच्या सहकार्याने योजनेतील दिव्यांग, विधवा, निराधार लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप झाले.

संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी लाभार्थींना प्रति महिना एक हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितले. योजनेचे सदस्य सचिन चव्हाण, तलाठी पवन सुतार, ग्रामसेवक व्ही. डी. बोराडे, अजय भंडारी, अमोल सूर्यवंशी उपस्थित होते.

फोटो ओळी : चावरे येथे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती योजनेतील लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप प्रसंगी सदस्य सचिन चव्हाण, तलाठी पवन सुतार, सरपंच शारदा गुरव, ग्रामसेवक व्ही. डी. बोराडे, प्रकाश चव्हाण, अमोल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Web Title: Sanjay Gandhi Niradhar and Shravanbal sanction order allotment in Chawre