सांगरुळ जि. प. मतदार संघातील विकास कामे पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST2021-09-02T04:50:56+5:302021-09-02T04:50:56+5:30
म्हारुळ विकासकामांचे उदघाटन लोकमत न्यूज नेटवर्क सांगरुळ - सांगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ...

सांगरुळ जि. प. मतदार संघातील विकास कामे पूर्ण करणार
म्हारुळ विकासकामांचे उदघाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरुळ - सांगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गाव आणि वाड्या-वस्त्यांवर विकास कामे सुरू आहेत. म्हारुळ गावामध्ये पूर्ण झालेल्या कामांचे आज उद्घाटन होत आहे. गावातील उर्वरित अपूर्ण विकास कामासाठी निधी देऊन ती पूर्ण करणार, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांनी दिली.
म्हारुळ (ता. करवीर) येथे सुभाष सातपुते यांच्या विशेष फंडातून गावांतर्गत मूलभूत सुविधांमधील तीन हाय मास्ट दिवे गावासाठी मंजूर केले आहेत. त्यापैकी श्री गणेश मंदिर म्हारुळ येथील हाय मास्ट दिव्याचा उद्घाटन समारंभ सुभाष सातपुते यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वंदना म्हाकवेकर होत्या.
यावेळी सुभाष सातपुते यांनी म्हारुळ गावासाठी आणखी दोन हाय मास्ट दिवे, तसेच श्री गणेश मंदिरच्या वरच्या मजल्यासाठी निधी व स्मशानभूमी येथील शेडसाठी निधी देणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपसरपंच संदीप चौगले, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ व सर्व गणेशभक्त उपस्थित होते.