शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सोने व्यापाऱ्यांना लुटणारी सांगलीतील टोळी गजाआड, मावसभावानेच मित्रांसोबत रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:45 IST

रत्नागिरी : कोकण रेल्वेत दोन सोने व्यापाऱ्यांकडील सुमारे २७ लाख ८६ हजारांची रोकड लुटणाऱ्या सहाजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी ...

रत्नागिरी : कोकण रेल्वेत दोन सोने व्यापाऱ्यांकडील सुमारे २७ लाख ८६ हजारांची रोकड लुटणाऱ्या सहाजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी जेरबंद केले आहे. त्यातील एका व्यापाऱ्याचा मावसभाऊ या टोळीमध्ये असून, त्यानेच या चोरीचा कट आखल्याचे तपासात पुढे आले आहे. या टोळीकडून पोलिसांनी २७ लाख ८६ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

सांगली येथील प्रसिद्ध सोने व्यापारी प्रशांत भीमराव माने व विनोद रावसाहेब महीम हे दोघे केरळ येथे होलमार्क मशीन खरेदीसाठी २७ लाख ८६ हजारांची रोकड घेऊन जात होते. १ मे रोजी ते रत्नागिरीतून जामनगर तिरुवल्ली एक्सप्रेसने केरळकडे निघाले. पैशाची बॅग त्यांनी सीटखाली ठेवली. मात्र थोड्याचवेळात ती बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत रेल्वे सुटल्याने ते कणकवली स्थानकात पोहचले. तेथून रत्नागिरीत येऊन त्यांनी चोरीची तक्रार दिली.पोलीस अधीक्षक डाॅ. गर्ग यांनी तत्काळ एक पथक नेमले. व्यापारी रत्नागिरीत आले, तेव्हा त्यांच्या संपर्कातील कोण कोण रेल्वे स्थानकात होते का, याचा शोध सुरु झाला. महीम यांचा मावस भाऊ सुरज बाळासाे हसबे (३९,रा. खानापूर, सांगली, सध्या रा. केरळ) रेल्वे स्थानकात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.

सर्व प्रथम सुरजला केरळमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्याने चोरीची कबुली दिली. आपले सहकारी सांगलीत असून रक्कम त्यांच्याकडेच असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. शहर पोलिसांचे दुसरे पथक सांगलीकडे गेले. तेथे पोलिसांनी उमेश सूर्यगंध (३४, रा. वाळवा, सांगली), अजय शिंदे (२१, मंगरुळ, सांगली), तुषार शिंदे (२२, रा. मंगरुळ, सांगली), यश वेदपाठक (१९, रा. हिवरे सांगली), विकास चंदनशिवे (२३, पारे, सांगली) या पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांनी कट रचून ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.सांगलीतील वीटा येथून सहाजणांना रोख रकमेसह चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डाॅ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले, उपनिरीक्षक आकाश साळुंखे, हवालदार प्रवीण बर्गे, पोलीस नाईक गणेश सावंत, विलास जाधव, मालोकर, प्रसाद घोसाळे, वैभव नार्वेकर हे या कारवाईत सहभागी होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी