शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: खून करून पळाला.. आजीला भेटायला येताच पकडला; गांधीनगर खुनातील संशयित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:53 IST

मुंबई, कोलकाता येथे वास्तव्य; केस, दाढी वाढवून आला

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून गांधीनगरात तरुणाचा खून केलेल्या आठजणांच्या टोळीतील पसार आरोपी संदेश अजय तायडे (वय १९, रा. गांधीनगर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर बाजार येथून बुधवारी (दि. २५) अटक केली. गेली पाच महिने तो मुंबई आणि कोलकाता येथे लपला होता. सदर बाजार येथे आजीला भेटायला येताच त्याला पोलिसांनी अटक केली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपी तायडे आणि त्याच्या सात साथीदारांनी १० जानेवारी २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गांधीनगरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ विठ्ठल ऊर्फ बबलू सुभाष शिंदे (वय २४, रा. कोयना वसाहत, गांधीनगर) याचा खून केला होता. त्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन मुलांसह सातजणांना पोलिसांनी अटक केली होती. पसार झालेल्या तायडेचा गांधीनगर पोलिसांकडून शोध सुरू होता. तो सदर बाजार येथील त्याच्या आजीकडे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून तायडे याला अटक केली. खून करून पळाल्यानंतर मुंबई आणि कोलकाता येथे लपल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. पुढील तपासासाठी त्याचा ताबा गांधीनगर पोलिसांकडे देण्यात आला.

केस, दाढी वाढवून आलापोलिसांना सापडू नये यासाठी संदेश तायडे याने गांधीनगरातील मित्रांशी संपर्क करणे टाळले होते. त्याने स्वत:चा मोबाइल नंबरही बंद ठेवला होता. गांधीनगरात जाण्याऐवजी तो सदर बाजार येथील आजीकडे गेला. ओळख लपवण्यासाठी त्याने केस आणि दाढी वाढवली. मात्र, अंमलदार वैभव पाटील यांना खबऱ्याकडून नेमकी टिप मिळाली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.